जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

 

 फलटण टुडे ( सातारा दि. 14 ) : 
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्त झालेल्या तसेच सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 42 दि. 26 ऑगस्ट 2022 च्या कलम 7 नुसार एकूण 188 ग्रामपंचायत मधील 279 सदस्य व थेट सरपंचाच्या 12 रिक्त जागांच्या पोट निवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी महसूल प्रशांत आवटे यांनी कळविले.

            पोट निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती / घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

            तालुकानिहाय रिक्त पदांच्या पोट निवडणूकांसाठी पात्र असणाऱ्या ग्रामपंयाचतींची संख्या पुढीलप्रमाणे . सातारा तालुक्यात 31 गांवे, कराड-19, खंडाळा -5, पाटण-13, वाई-9, महाबळेश्वर-32, कोरेगांव-19, माण-3, जावली-34, फलटण-11, खटाव तालुक्यातील 12 गावांचा समावेश आहे.

            वरील पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावाचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार 18 एप्रिल 2023. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) मंगळवार दि. 25 एप्रिल ते मंगळवार दि. 2 मे 2023 सकाळी 11 ते दुपारी 3 वा. पर्यंत (शनिवार दि. 29 , रविवार दि. 30 एप्रिल व सोमवार दि. 1 मे 2023 ची सार्वजनिक सुट्टी वगळून). नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) बुधवार दि. 3 मे 2023 रोजी सकाळी 11 वा. पासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ) सोमवार दि. 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वा. पर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ सोमवार दि. 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वा. नंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक गुरुवार दि. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 वा. पासून सायं. 5.30 वा.पर्यंत. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाणी व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) शुक्रवार दि. 19 मे 2023. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक बुधवार दि. 24 मे 2023 पर्यंत.

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!