फलटण टुडे (फलटण) दि १४ :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या “जयंती” निमित्त आंबेडकर चौक, फलटण येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा यांनी विनम्र अभिवादन केले, यावेळी मा.नगरसेवक श्री.किशोरसिंह नाईक निंबाळकर, श्रीराम कारखाना संचालक श्री.महादेवराव माने, श्री.तुषार नाईक निंबाळकर, श्री.अय्याज शेख, श्री.विजय गाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते, याप्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, फलटण’चे पदाधिकारी व नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.