*
फलाटण टुडे (फलटण दि. ११ ) :
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती, फलटण आणि आई प्रतिष्ठान, वाठार निंबाळकर यांचे संयुक्त सहभागाने फलटण तालुकास्तरीय निबंध स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेला तालुक्यातील असंख्य स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभपूर्वक करण्यात आले.
थोर समाज सुधारक आणि महापुरुषांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर रहावा, त्यांना त्याची गोडी लागावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
सदर स्पर्धा ४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल जाहीर झाला असून म. फुले चौकात आयोजित जयंती महोत्सव कार्यक्रमात या स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभपूर्वक करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे –
इयत्ता १ ली ते ३ री गट :
प्रथम क्रमांक कु. दुर्वा रविंद्र सस्ते निरगुडी, द्वितीय क्रमांक कु. ईश्वरी मनोज रासकर, तृतीय क्रमांक कु. मनवा शांताराम जाधव तांबवे.
इयत्ता ४ थी ते ७ वी गट :
प्रथम क्रमांक कु. प्रगती मच्छिंद्र मदने निरगुडी, द्वितीय क्रमांक अमर तानाजी राठोड मिरगाव, तृतीय क्रमांक संस्कार अनिल घनवट, फलटण.
इयत्ता ८ वी ते १२ वी गट :
प्रथम क्रमांक वैष्णवी अनिल घनवट फलटण, द्वितीय क्रमांक अंकिता आप्पा सरक फलटण, तृतीय क्रमांक श्रेया दत्तात्रय रणवरे, मिरगाव.
खुला गट :
प्रथम क्रमांक अनिल कुंडलिक भुजबळ सासवड, द्वितीय क्रमांक
स्नेहल संजय बोबडे बिबी, तृतीय क्रमांक सौ. शारदा मनोज डंगारे तडवळे. विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र व सौ.अंजली शशिकांत गोडसे लिखित ज्ञानसूर्य महात्मा फुले हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले
सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महात्मा फुले चौक, फलटण येथे संपन्न झाला.
निबंध स्पर्धेच्या आयोजनाबद्दल विविध स्तरातून आयोजकांचे कौतुक होत आहे.