फलटण टुडे (मुंबई, 12 एप्रिल ), (क्री. प्र.) : –
जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशन (IISF) ने बेंगलोर येथे न्युझीलँड एशिया कप स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा २ ते ६ मे या कालावधीत पार पडणार असल्याची घोषणा इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजय नाईक व सचिव मिलिंद पुंजा यांनी जाहीर केले.
या स्पर्धेत यजमान भारतासह, न्युझीलँड, श्रीलंका, युएई व सिंगापूर असे पाच देश सहभागी होत आहेत. या स्पर्धेत खुला व मास्टर्स (+४०) गटाचे संघ सहभागी होत आहेत.
सदर स्पर्धेसाठी बेंगलोर येथे २५ मार्च रोजी मैदानी चाचणी घेऊन भारतीय संघाच्या २४-२४ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने भारताने दोन्ही गटात दोन-दोन संघ उतरवण्याचे ठरविले आहे. मुख्य भारतीय संघ व विकास (डेवलपमेंट) भारतीय संघ. यामध्ये महाराष्ट्रातून खुल्या गटात दोन खेळाडूंची तर मास्टर्स गटात दहा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडुंचे शिबीर मुंबई, महाराष्ट्र व बेंगलोर, कर्नाटक येथे आयोजित केले आहे. मुंबईत गुरुवार (13 एप्रिल) पासून शनिवार (15 एप्रिल) पर्यंत प्रशिक्षण शिबीर पार्क क्लब, दादर येथे आयोजित केले आहे. या शिबिराला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक प्रसन्ना कुमार मार्गदर्शन करणार आहेत. प्रसन्ना कुमार यांनी यापूर्वी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व सुध्दा केले आहे.
महाराष्ट्रातून निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे.
खुला गट : डेवलपमेंट इंडिया – नचिकेत कांबळी व शुभम खोत
मास्टर्स (+40) इंडिया – नरेश खुरणा व मनीष मित्तल
मास्टर्स (+40) डेवलपमेंट इंडिया – गौरव कांबळी, राकेश चव्हाण, अमित घेजी, अभिषेक मुदगल, हरेश खत्री, अंशूल शर्मा, निख्रव शाह व प्रशांत कारिया.
महाराष्ट्रातून खेळाडूंच्या झालेल्या निवडीबद्दल, महाइंडोअर क्रिकेट असोसिएशनचे (महाराष्ट्र) कार्याध्यक्ष क्षितिज वेदक व सेक्रेटरी – बाळ तोरसकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.