क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करताना प्राचार्य बाबासाहेब गंगवणे व इतर मान्यवर
फलटण टुडे (फलटण) दि ११ :
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी मा.प्राचार्य श्री बाबासाहेब गंगवणे , उपप्राचार्य श्री ए वाय ननावरे ,उ ज्युनिअर चे उपप्राचार्य एम के फडतरे पर्यवेक्षक श्री शिवाजीराव काळे , व्ही जेशिंदे , पर्यवेक्षिका सौ. बगाडे मॅडम , दुपार विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुखसंदीप लोंढे , सकाळ विभागाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ टि व्हि शिंदे आणि सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
यावेळी महात्मा फुले जयंती निमित्त प्रशालमध्ये निबंध स्पर्धा ,वक्तृव स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक विद्यार्थांनी सहभाग नोंदवला
या वेळीसांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री संदीपलोंढे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रशालेचे प्राचार्य श्री बाबासाहेब गंगवणे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील कार्य याविषयी आपलं मनोगत व्यक्त केले. शेवटी सौ लोणकर मॅडम यांनी आभार मानले .