चौकट :
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे खेळ खालील मैदानावरती घेतले जातील :-
1 ) हॉकी , फुटबॉल , खो-खो :- श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल, फलटण.
2 ) कुस्ती , कबड्डी , अथलेटिक्स , वॉलीबॉल : – मुधोजी महाविद्यालय , फलटण ,
3 ) बास्केटबॉल : – .मुधोजी क्लब
4 ) आर्चरी :- श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल , जाधववाडी , फलटण
येथे 13 एप्रिल ते 25 एप्रिल संपन्न होणार आहे .
फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीच्या वतीने 13 ते 25 एप्रिल उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
फलटण टुडे ( फलटण ) दि.11: –
फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीच्या वतीने गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 ते मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी क्रीडा मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले आहे.
सदर उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये हॉकी , फुटबॉल , बास्केटबॉल , वॉलीबॉल ,खो-खो , कबड्डी , कुस्ती , ॲथलेटिक्स व आर्चरी या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी शिबिरार्थी खेळाडूंना तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच खेळाडूंना या शिबिरामध्ये खेळाडूंचा आहार कोणता आसावा ज्यामुळे स्नायू बळकट होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी रोजच्या सकस आहारामधे असाव्यात जसेकी फळे , भाजीपाला इत्यादी विषयी मार्गदर्शन व खेळामध्ये होणाऱ्या दुखापती यावरती केले जाणारे प्रथमोपचार अशा वेगवेगळ्या विषयांवर देखील मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी शिबिरार्थी खेळाडूंना रोज सकाळी अल्पोपहार दिला जाईल.
फलटण शहरातील सर्व शाळेतील खेळाडूंनी या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
हे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल फलटण, मुधोजी क्लब ( माळजाई मंदिरा शेजारी ), मुधोजी महाविद्यालय फलटण (सातारा रोड ) , श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल , जाधववाडी या ठिकाणी आयोजित केले आहे.
या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी सकाळी ठीक 6:०० वा . श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल , फलटण या ठिकाणी होणार आहे .
सदर उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यासाठी क्रीडा समितीचे चेअरमन मा. श्री शिवाजीराव घोरपडे , प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम , मुधोजी हायस्कूल चे प्राचार्य श्री बाबासाहेब गंगवणे , क्रीडा समितीचे सदस्य शिरीष वेलणकर, महादेव माने, संजय फडतरे, तुषार मोहिते, स्वप्निल पाटील, तायप्पा शेंडगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . अशी माहिती क्रीडा समितीचे सचिव श्री सचिन धुमाळ यांनी दिली