महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर
फलटण टुडे (फलटण ) दि.11:
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या “जयंती” निमित्त महात्मा फुले चौक, फलटण येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले,
यावेळी मा.नगराध्यक्ष श्री.पांडुरंग गुंजवटे, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण’चे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, पंचायत समिती मा.उपसभापती श्री.विवेक शिंदे, श्रीराम कारखाना संचालक श्री .महादेवराव माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते, यावेळी महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती पदाधिकारी यांच्या वतीने श्री.विकास नाळे (उपसरपंच, कोळकी) यांच्या शुभहस्ते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचा यथोचित सत्कार करण्यात आला, याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व नागरिक बंधू-भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.