फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विविध विभागांच्या वतीने प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आली होती. सिव्हील इंजिनिअरींग विभागाच्या वतीने कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट प्रक्रिये संदर्भातील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या मार्गदर्शन शिबिरासाठी प्रा. बी. टी. आडे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कम्प्युटर इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी “डेटा सायन्स युजिंग पायथाॅन” याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. आयटेक सोल्युशन प्रा. लि. या कंपनीने या प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कम्प्युटर विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील सर्व विद्यार्थ्यांना मॅटलॅब, सिमुलिंक, अॅन्ड इट्स अॅप्लीकेशनस बाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच मेकॅनिकल विभागातील सर्व विद्यार्थ्यांना “३डी. माॅडेलींग विथ क्रिओ” बाबतचे प्रशिक्षण देण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी. नार्वे यांनी दिली.
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विविध विभागांच्या वतीने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
फलटण टुडे (फलटण) : –
अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्याने कौशल्याधारीत, उद्योगशील, प्रशिक्षित अभियंते तयार होतील व समाजाच्या जडणघडणीमध्ये योगदान देतील असे आवाहन यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांनी केले.