फलटण टुडे (बारामती ): –
रुई मधील ग्रामदैवत भैरवनाथ यांच्या जत्रा निमित्त भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने बुधवार दि.१२/०४/२०२३ रोजी सांयकाळी ७ वाजता भैरवनाथ देवाचा हळदी चा कार्यक्रम ,रात्री ९ वाजता निर्माता संजय फलफले स्वराधीन पुणे निर्मित मराठी, हिंदी गीत,संगीत व नृत्याचा कार्यक्रम पाव्हन फक्त तुमच्यासाठी,
गुरुवार दि.१३/०४/२०२३ रोजी सकाळी ०८ वाजता काठी, पालखी मिरवणूक, दंडवत, नेवैद्य व घोटा कार्यक्रम सांयकाळी ७ वाजता लग्नसोहळा व रात्री ८ नंतर छबिना काठी पालखी मिरवणूक व शोभेचे दारूकाम रात्री ९ वाजता बंजारा एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रसिद्ध नृत्यगना पतंजली पाटील, अवनी, अंबिका मुंबईकर, पल्लवी पुणेकर यांचा
३६ नखरेवाली लावण्यांचा कार्यक्रम .
शुक्रवार दि.१४/०४/२०२३ रोजी सकाळी १०ते ३ हजेरी कार्यक्रम सिनेस्टार विशालकुमार,विनोद सम्राट तुषारकुमार भाडळेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम व दु.४:३० ते ७ निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा आशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व ग्रामस्थ, भाविकांनी उपस्तीत राहण्याचे आवाहन भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट रुई चे संस्थापक अध्यक्ष महादेवराव चौधर, विश्वस्त मच्छिंद्र चौधर, पांडुरंग चौधर, खजिनदार पोपट साळुंके यांनी केले आहे