फलटण टुडे (सातारा, दि. 8) :
सातारा तालुक्यातील ड वर्गातील 11 सहकारी संस्थांच्या सन 2023-2024 ते 2028-2029 या कालावधीचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक पार पाडण्यासाठी सहकारी संस्थांच्या प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ज्या सदभासदांना हरकती किंवा आक्षेप असतील त्यांनी 12 एप्रिल 2023 पर्यंत लेखी स्वरुपात देण्यात यावे, असे तालुका सहकारी अधिकारी तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था शंकर पाटील यांनी कळविले आहे.
मतदार यादी अंतिम करावयाच्या संस्था : सहजीवन स्त्री सहकारी संस्था, सातारा, सह्याद्री औद्योगिक सहकारी संस्था, सातारा, सह्याद्री महिला कृषि उद्योग बहुउद्देशिय सेवा सहकारी संस्था, सातारा, अजिंक्य सहकारी मुद्रणालय, सातारा, विजय हाईटस् मेंन्टनन्स को-ऑप, सातारा, स्मार्ट लेडी फिटनेस को-ऑप, सातार, श्री. केदारेश्वर बोटींग क्लब व पर्यटन सहकारी संस्था रोहोट जि. सातारा, श्री. बालाजी सुशिक्षीत व प्रशिक्षीत स्वयंरोजगार सह. सेवा संस्था, सातारा, श्री महालक्ष्मी स्वयंरोजगार सहकारी संस्था, सातारा, ओमसाई स्वयंरोजगार सहकारी संस्था, सातारा व श्री. बालाजी व्यापारी संकुल गाळेधारकांची सहकारी संस्था, सातारा.