औद्योगिक क्षेत्रातील मानबिंदू 'किशोर भापकर साहेब

*’* 

किशोर भापकर

फलटण टुडे (बारामती ): –
सामान्य शेतकरी कुटूंबातून असून सुद्धा जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर यश मिळाल्यावर यश टिकवत सामाजिक व औद्योगिक व विविध क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे किशोर भापकर साहेब म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील मानबिंदू होय.

खताळ पट्टा येथे १९६३ साली सामान्य शेतकरी कुटूंबात जन्म झाला शेणाने सारवलेल्या घरात बालपण गेले, दोन बहिणी व दोन भाऊ असा परिवार ,भवानी नगर येथील जिल्हा परिषद शाळे जाण्यासाठी बैलगाडी शिवाय त्याकाळी पर्याय नसायचा शिक्षणाची आवड पाहून वडिलांच्या सूचनेनुसार १९७५ साली बुरुड गल्ली येथे राहण्यास आल्यानंतर म ए सो विद्यालय येथे ८ ते १० पर्यंत चे शिक्षण घेतले त्यानंतर टी सी कॉलेज येथे ११ वी व १२ वी पर्यंत शिक्षण घेतले पुढील अभियांत्रिकी शिक्षण घेण्यास बारामती मध्ये सुविधा नसल्याने नाईलाजाने कर्नाटक मधील मणीपाल इन्स्टिट्यूट या ठिकाणी प्रवेश घेतला शिक्षणा बरोबर क्रिकेट मध्ये सुद्धा चमक दाखवत रणजी सामन्यात कर्नाटक च्या संघात सुद्धा स्थान पटकवले होते परंतु त्यावेळच्या परिस्थिती नुसार उदरनिर्वाहासाठी खेळा पेक्षा शिक्षण पूर्ण करणे महत्वाचे होते त्यामुळे बी ई पूर्ण होताच वालचंद नगर इंडस्ट्रीज मध्ये तिन्ही शिफ्ट मध्ये ७५० रुपये महिना या पगारासाठी नोकरी स्वीकारली.
अनेक वरिष्ठ अधिकारी यांच्या बरोबर मार्गदर्शन खाली काम करताना अनुभव वाढत होता तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांच्या संकल्पनेतुन बारामती एमआयडीसी १९९१ स्थापन झाली व त्यावेळी ‘कल्याणी स्टील’ मध्ये सिनिअर इंजिनिअर म्हणून नोकरी स्वीकारली त्यानंतर २००६ साली अनुभव च्या जोरावर आय एस एम टी मध्ये प्लांट हेड व सद्या ‘ किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज’ मध्ये प्लांट हेड म्हणून जवाबदारी समर्थपणे पार पाडत आहे एकूण 32 वर्ष सेवा करीत त्यांच्या काळात ८ यशस्वी वेतन करार संपन्न झाले. 

 *कामगार प्रिय साहेब* 
तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलांना नौकरीच्या माध्यमातून रोजगार मिळावा हा मूळ भापकर साहेबांचा उद्देश्य असल्याने बारामती एमआयडीसी व आय एस एम टी मध्ये अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली.प्रत्येक्ष व अप्रत्येक्ष अनेकांना रोजगार प्राप्त झाला 
ज्यावेळी आर्थिक मंदी किंवा इतर अडचणी निर्माण झाल्या तेव्हा सर्व कामगारांना प्रेरक मार्गदर्शन ,सहकार्य करीत कंपनीचा डोलारा पडू दिला नाही एकजूट ठेवत कंपनी व कामगार यांच्या मधील दुवा म्हणून कार्य केले.
आय एस एम टी चे काम करताना बारामती एमआयडीसी मधील अनेक कंपन्यांना ,उद्योजकांना व कामगारांना वेळोवेळी मार्गदर्शन सहकार्य व प्रसंगी मा. शरद पवार साहेब, अजितदादा पवार, खा सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार उत्तम कार्य केले व औद्योगिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली 
संतुष्ट व समाधानी कर्मचारी तयार झाले हीच म्हतपूर्ण बाब जीवनात आनंद देते असे भापकर साहेब आवर्जून सांगतात

 *सामाजिक भान व जाण* 
माजी राष्ट्रपती डॉ अब्दूल कलाम यांच्या हस्ते वालचंद नगर येथे बेस्ट एम्प्लॉयी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
शेतकऱ्याच्या द्राक्षाला बाजारभाव उत्तम मिळावा म्हणून तत्कालीन मॅकडोल कंपनी पिंपळी (सद्याची युनाटेड स्पिरिट ) येथे शेतकरी संचालक म्हणून काम केले.
बारामती एमआयडीसी मधील बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्स च्या माध्यमातून उद्योजक यांच्या समस्या शासन दरबारी मांडल्या, व औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी रक्तदान, वृक्षारोपण, व्यसण मुक्ती अभियान, प्रेरक मार्गदर्शन कार्यशाळा आदी चे आयोजन केले 
कंपनी टिकली तर कर्मचारी व कुटूंब टिकेल म्हणून पगारासाठी काम न करता कंपनी अर्थातच कुटूंबा साठी काम करु, समाज, देश बलवान करू  
हा विचार घेऊन सदैव कार्यरत असणारे श्री किशोर भापकर साहेब यांना वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा ………


——————–
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!