जैन सोशल ग्रुप फलटणचे सचिव श्रीपाल जैन यानां जैन सोशल ग्रुप्स इंटरनॅशनल फेडरेशन कडुन राष्टीय स्तरावरील बेस्ट सचिव पुरस्कार देऊन मुंबई येथे झालेल्या अॅवाॅर्ड सेरेमणी कार्यक्रमात गौरवण्यात आले.
जैन सोशल ग्रुप्स इंटरनॅशनल फेडरेशन चे राष्टीय अध्यक्ष ललित शहा व भारतीय मायनाॅरीटी कमिशन नवी दिल्ली चे सदस्य सुनीलजी सिंगी यांचे शुभहस्ते सन्मान चिन्ह देऊन जैन याचां सत्कार करण्यात आला.यावेळी नियोजित प्रेसीडेंट अमितजी झवेरी,ईलेक्टेड प्रेसीडेंट बिरेनजी शहा, कोल्हापुर झोन को- आॅर्डिनेटर सुनित परिख, जैन सोशल ग्रुप फलटणचे अध्यक्ष डाॅ.सुर्यकांत दोशी ऊपस्थीत होते.
बेस्ट सचिव पुरस्काराबद्दल सर्व स्तरातुन श्रीपाल जैन यांचे अभिनंदन करण्यात आले. जैन सोशल ग्रुप्स इंटरनॅशनल फेडरेशन चा पुरस्कार प्रथमच फलटण ग्रुप ला मिळाला.सत्काराबद्दल बोलताना जैन यांनी फलटण जैन सोशल ग्रुपचे सर्व पदाधिकारी ,रिजन व झोन पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे दोन वर्षात अनेक सामाजीक कामे करु शकलो त्यामुळेच बेस्ट सचिव पुरस्कार मिळाल्याचे नमुद केले.