**
फलटण टुडे (बारामती : –
सेवा निवृत्ती नंतर पेन्शन ,फंड व इतर उपजीविका साठी साधन नसताना नैराश्य झटकून जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर वयाच्या ६५ नंतर ‘सूप ‘ विक्री हे व्रत समजून सेवा देणारे गरुड दांपत्य सूप क्षेत्रात विविध प्रयोग करून ‘गरुड भरारी’ घेत आहे .
शेवगा ,दुधी भोपळा ,पालक, टोमॅटो यांचे आरोग्यवर्धनी गरमागरम सूप हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब व इतर आजारांना यांना दूर ठेवते त्यामुळे पहाटे व्यायाम केल्यावर सूप वाले गरुड काका यांच्या कडे पाऊले सहज वळतात.
बारामती शहरातील कोर्ट च्या समोरील चौकात वामन गरुड वय वर्ष 70 यांचा पहाटे ६ वाजता ‘सूप ‘ चे छोटेखानी दुकान सुरू होते.
प्लास्टिक मुक्त कागदी कप,चकचकीत स्टील थर्मास, पाण्याचा जार, फोल्डिंग टेबल व कचरा होऊ नये म्हणून कागदी मोठी पिशवी असलेले छोटेखानी दुकान सकाळी ६ ते ९ वाजे पर्यंत चालू असते.
पोहायला जाणारे, चालणारे, पाळणारे ,सायकल चालविणारे योगा व जिम करणारे आणि सर्व सामान्य पासून विविध क्षेत्रातले नागरिक सूप पिण्यासाठी आवश्य येतात .
अत्यल्प किमती मध्ये सदर सूप दिले जाते लहान मुले, आजारी व्यक्ती, गरजू,कचरा वेचक यांना सामाजिक व्यक्ती म्हणून मोफत सूप गरुड दाम्पत्य देतात.
गुजरात येथे गरुड दाम्पत्य एका खाजगी कंपनीत कामाला असताना सेवा निवृत्ती नंतर काम करावे लागणार आशा वेळी गुजरात येथूनच विविध भाज्यांचे सूप बनविणे ही कला अवगत केली सेवा निवृत्ती नंतर व्यवसाय करणे क्रमप्राप्त होते
कारण पेन्शन,फंड नाही, पैसे जवळ नसल्याने नातेवाईक बोलवत नाही व सेवा निवृत्ती नंतर उपजीविका साठी साधन नसल्याने हा व्यवसाय स्वीकारला असून
वृषाली गरुड काकी गुरुवार व रविवारी भोपळा शेवगा टोमॅटो पालक मसाले लिंबू आदी साहित्य खरेदी करून निवडून चिरून आदल्या तयार ठेवतात व पहाटे ३ ला सूप तयार करतात व पहाटे ६ वाजता काका स्टोल वर विक्री साठी तयार असतात त्यामुळे दिनचर्या मध्ये कमी झोप मिळते व मोबदला सुद्धा कमी मात्र ग्राहकांचे समाधान पाहून संतुष्ट होत असल्याचे गरुड दाम्पत्य सांगतात
*सामाजिक बांधिलकी*
नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर दर महा ठराविक रक्कम नर्मदा परिक्रमा साठी बाजूला ठेवणे इतरांना परिक्रमा साठी मोफत मार्गदर्शन करणे अनाथ आर्थिक ,अपंग, आर्थिक कमकुवत यांना मोफत ‘सूप ‘ वाढीवसानिमित उपस्तीत सर्वाना देणे.
व्यवसायातील धडपड व सामाजिक बांधिलकी पाहून अनेक संस्थांनी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
*व्रत म्हणून स्वीकारले*
पहाटे ६ वाजता माझी कोणतरी वाट पहात आहे त्यामुळे ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पहाटे तीन पासून दिनक्रम सुरू होतो परंतु कोणतेही तक्रार नाही पावसाळ्यात अंदाज चुकतो नुकसान होते परंतु दिनक्रम चुकत नाही दोन्ही मुले उच्च शिक्षित आहेत नोकरी करतात परंतु त्यांचा वेळ पैसा त्यांच्या साठी त्यामुळे आपली कमाई आपण करायची हे व्रत स्वीकारून ‘सूप’ च्या माध्यमातून ग्राहकांची सेवा करीत आहेत.
वृद्ध दाम्पत्य ‘सूप ‘ विक्री च्या माध्यमातून बारामती परिसरात स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करताना व व्यायामाचे महत्व सांगत तरुणांना लाजवेल आशा पद्धतीने काम करत असल्याने आरोग्यास उत्तम असणारे गरमागरम ‘सूप’ ची चव व्यायाम प्रेमी व रुग्णांना उपयोगी पडत आहे
विविध पेये पिण्यापेक्षा व्यायाम केल्यावर आरोग्यास उपयोगी सूप सकाळी गरमागरम मिळते व वृद्ध दाम्पत्याचा या वयातील उत्साह दिनक्रम व आदरातिथ्य पाहून आश्चर्य वाटते
खंडू गायकवाड
व्यवस्थापक कॉटन किंग
बारामती यांनी सांगितले