“*
फलटण टुडे(बारामती ): –
पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते ! या ब्रीदवाक्यावर साप्ताहिक झुंज न्यूज व स्वराज्य रक्षक न्यूज प्रणित “स्वराज्य झुंज” समाजभूषण पुरस्कार २०२३ सोहळ्याचे ताथवडे येथील रागा इम्पेरिअर हॉटेल मध्ये दिमाखदार आयोजन करण्यात आले होते.
या शानदार पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, कला, सांस्कृतिक, उद्योजक, शैक्षणिक आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्तृत्ववान व प्रतिभावान मान्यवरांना प्रसिद्ध अभिनेते संजय खापरे व प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नामदेव जाधव यांच्या शुभहस्ते शिल्ड व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ मा. अध्यक्ष व साप्ताहिक झुंजचे संपादक अनिल वडघुले व स्वराज्य संकल्प भूमी पेमगिरी येथील समाजसेवक शिवराज नाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
अभिनेते संजय खापरे म्हणले कि, साप्ताहिक झुंज व स्वराज्य रक्षक न्यूज ने कतृत्ववान व्यक्तींचा गौरव करून त्यांच्या कार्याला झळाळी तर दिलीच शिवाय समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.
शिवव्याख्याते प्रा. नामदेव जाधव म्हणाले कि, असे म्हणतात माणसे हेरावित आणि माणसे पेरावित. हेरल्याशिवाय पेरता येत नाही परंतु हेरण्याचे काम अवघड असते. हे हिरे हेरण्याचे काम करणार्या “स्वराज्य झुंज” पुरस्काराने केले आहे.
या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन साप्ताहिक झुंज चे सहसंपादक प्रसाद अनिलराव वडघुले व स्वराज्य रक्षक न्यूज चे संपादक प्रा. सोमनाथ सुभाष नाडे यांनी केले होते. सर्व पुरस्कार्थींच्या वतीने पोलीस उप-अधीक्षक अनिल पवार यांनी आभार व्यक्त केले.
*पुरस्कार्थी पुढील प्रमाणे*
*प्रशासकीय क्षेत्र* : मुळशी वन परिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, पोलीस उपधीक्षक अनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने.
*सामाजिक क्षेत्र* : घनगड प्रतिष्ठान( गड संवर्धन), थेरगाव सोशल फाउंडेशनचे अनिकेत प्रभू, इन अध्यक्ष प्रतीक पोळ, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, हरी ओम ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष नामदेव गोगावले, झेप फाउंडेशन अध्यक्ष महेश बोडके, सरपंच सुरेख तोंडे, विशेष कार्यकारी अधिकारी भाग्यदेव घुले, सरपंच सोमेश्वर गचांडे, समाजसेविका कांचल जावळे, समाजसेविका करिष्मा बारणे, झेप फाउंडेशन उपाध्यक्ष राजाराम शितोळे, समाजसेवक राकेश भानुसे.
*उद्योजक क्षेत्र* : बांधकाम व्यवसायिक मंगेश बारणे, ब्युटी इन्स्टिट्यूटस संचालक संदीप कौल, इन्व्हेन्ट ऑर्गनिझर नितेश गायकवाड, बांधकाम व्यवसायिक वासुदेव आचमेटी, तुळजाभवानी एंटरप्रायजेस संचालक रमेश मोटे, बांधकाम व्यवसायिक शंकर खांडके, विश्वकर्मा इव्हेंट मॅनेजमेंटसंचालक मोनेश पांचाळ, ओमनाथ बॅटरी चे संचालक कमलेश बालघरे, इरीच इंटर इंडिया लिमिटेड आणि सान्वी डेव्हलपर्स.
*कायदे क्षेत्र* : Adv. राजेश राजपुरोहित, Adv. गणेश शिंदे आणि Adv. स्नेहा कांबळे
*शैक्षणिक क्षेत्र* : सरस्वती क्लासेस संचालक महेंद्र शिखरे, पवार प्री स्कुल संचालक चैताली पवार, संजय गायकवाड (आदर्श पालक)