फलटण टुडे : –
फलटण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी श्री.नितीन करे व सरचिटणीस पदी श्री.गणेश तांबे* यांची निवड झाल्यानंतर आज गुरूवर्य कै. श्री. गणपतराव काळंगे गुरुजींच्या मोळ ता.खटाव येथील स्मृतीस्थळाला सदिच्छा भेट देण्यात आली.
गुरुवर्य कै. श्री.गणपतराव काळंगे गुरुजींच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा निर्धार यावेळी अध्यक्ष व सरचिटणीस यांनी व्यक्त केला
गुरुवर्य कै.श्री.गणपतराव काळंगे गुरुजींचे सुपुत्र व शिक्षक बॅंकेचे माजी वरिष्ठ अधिकारी श्री.काळंगे साहेब यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष श्री.सुरेंद्रकुमार घाडगे सर यांनी शिक्षक समिती मध्ये सर्वांना सन्मान जनक, समान वागणूक मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.समितीमध्ये सध्या जे घडतंय मनाला खुप वेदनादायी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा कार्याध्यक्ष श्री.उदयकुमार नाळे सर यांनी सध्या जिल्ह्यात जे सुरू आहे त्याची वाटचाल समितीचा संघ होण्याकडे असल्याची भीती व्यक्त केली. संघटनेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे कामकाज होणे अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्री.धन्यकुमार तारळकर सर यांनी संघटनेत एक व्यक्ती अनेक पदे व एक पद अनेक व्यक्ती हा विरोधाभास संपला पाहिजे असे मत मांडले.
यावेळी फलटण तालुका अध्यक्ष व सरचिटणीस यांनी लवकरच गुरुवर्य कै. श्री.गणपतराव काळंगे गुरुजींच्या विचारांची जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या भेटी घेणार असल्याचे सांगितले.थोड्याच दिवसात गुरुवर्य कै.श्री.गणपतराव काळंगे गुरुजींच्या स्फूर्ती स्थळावर जिल्ह्यातील सर्व निष्ठावंत सभासदांची मिटींग होणार असल्याचे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते आदरणीय आनंद गिरी गोसावी सर, तालुका नेते संतोष मोहिते सर, ज्येष्ठ मार्गदर्शक संजय जाधव सर,ज्येष्ठ मार्गदर्शक हनुमंत नाळे सर, शिक्षक नेते आनंदराव सोनवलकर सर, युवा नेते बाळकृष्ण गायकवाड सर, कोषाध्यक्ष संजय भोसले सर, प्रसिध्दी प्रमुख महेंद्र बनकर सर इ.उपस्थित होते.