आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून फलटण शहरात साकारणार महिला बहुउद्देशीय हॉल व फुडमॉल; फलटण पालिकेस विविध विकास कामांसाठी सुमारे 7 कोटी 39 लक्ष रुपयांचा भरघोस निधी

फलटण टुडे (फलटण) :
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नातून फलटण शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे 7 कोटी 39 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने भडकमकरनगरमध्ये महिलांकरिता बहुउद्देशीय हॉल तसेच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी फुडमॉल आदी विकासकामांचा समावेश आहे, अशी माहिती फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे यांनी दिली.

फलटण शहरातील विविध विकासकामांसाठी आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनाच्या नगरविकास विभागाकडून ‘वैशिष्ठ्यपूर्ण’ योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी रुपये 5 कोटी तर महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान अंतर्गत जिल्हा नियोजन समितीमार्फत 2 कोटी 39 लक्ष 84 हजार रुपयेचा निधी फलटण नगरपरिषदेस मंजूर करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले की, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत फलटण नगरपरिषद हद्दीतील भडकमकर नगर येथील खुल्या जागेत महिलांकरिता बहुउद्देशीय हॉल बांधण्याकरिता 2 कोटी 39 लक्ष 84 हजार रुपयेच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून नगरविकास विभागाकडून दि.25 मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फलटण नगरपरिषद हद्दीतील महात्मा फुले शॉपिंग सेंटर लगत फुड मॉल विकसीत करण्यासाठी 2 कोटी रुपये, दत्तनगर शिंदे इमारत ते दगडी पुल ते हनुमान मंदिर ते वेलणकर दत्त मंदिर बंदिस्त नाला बांधण्याकरिता 1 कोटी 95 लक्ष रुपये, पद्मावतीनगर येथील अंतर्गत रस्ते विकसित करण्यासाठी 90 लक्ष रुपये, प्रभाग क्रमांक 11 मधील खुशी अपार्टमेंट ते जाधव घरापर्यंत रस्ता विकसीत करण्यासाठी 15 लक्ष रुपये असा एकूण सुमारे 7 कोटी 39 लक्ष 74 हजार रुपयेचा निधी मंजूर झाला आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!