फलटण टुडे (बारामती ):
बारामती तालुक्यातील सावळ येथील रहिवासी
वंदन बापु बिबे ( वय ८० वर्ष) यांचे
बुधवार २२ मार्च रोजी अपघाती दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मूले ,सुना,नातवंडे असा परिवार असून सावळ च्या अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात त्यांचे योगदान होते.प्रगतशील शेतकरी म्हणून परिसरात त्यांनी ओळख निर्माण केली होती.
धनश्री महिला पतसंस्थेचे चेअरमन राणी बिबे यांचे ते सासरे व सावळ ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच व धनश्री पतसंस्थेचे मार्गदर्शक बापूसाहेब बिबे यांचे ते वडील होत.
त्यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे