कु.सई राजेंद्र सूळ राज्यात प्रथम
फलटण टुडे वृत्तसेवा : –
आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर हे नियमित वेगवेगळे उपक्रम राबवत असते. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे राज्यस्तरीय वाचन समृद्धी प्रश्नमंजुषा स्पर्धा होय.पुस्तकाचा स्नेह, पुस्तकाचे प्रेम, पुस्तकाचा जिव्हाळा वाढावा व वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन केल्याचे आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.गणेश तांबे यांनी व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये एकूण 1027 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सुमारे 135 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण पडले होते.या विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने खालील क्रमांक काढण्यात आलेले आहेत. या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये कु.सई राजेंद्र सुळ प्रथम क्रमांक – 500 रुपयांची पुस्तके व प्रमाणपत्र, कु. साक्षी संदीप टिळेकर द्वितीय क्रमांक 300 रुपयांची पुस्तके व प्रमाणपत्र, कु.अमृता श्रीराम कोटगिरे तृतीय क्रमांक 200 रुपयांची पुस्तके व प्रमाणपत्र, कु.संजना आनंद पवार उत्तेजनार्थ क्रमांक 100 रुपयांचे पुस्तक व प्रमाणपत्र. दुसरा उत्तेजनार्थ क्रमांक कु.ईशानी बाळकृष्ण गायकवाड 100 रुपयाचे पुस्तक व प्रमाणपत्र
सदर स्पर्धेचे बक्षीस प्रायोजक फलटण येथील प्रसिद्ध डॉक्टर व आमचे मार्गदर्शक डॉ. रविंद्र बिचुकले- शिंदे (M.S) हे होते.सदर प्रश्नमंजुषामधील प्रश्न पुस्तक व पुस्तकाचे लेखक व साहित्य क्षेत्रातील चालू घडामोडी यावर आधारित बहुपर्यायी होते.सदर स्पर्धा 15 वर्षा पर्यंतच्या वयोगटासाठी होती. सदर स्पर्धेची प्रश्न निर्मिती जावली तालुक्यातील शिष्यवृत्ती तज्ञ शिक्षक श्री.नितीन जाधव व आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर यांनी केली होती.
आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे. अनेकांनी आई प्रतिष्ठानच्या उल्लेखनीय कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.