४ थी आशियाई खो-खो स्पर्धा भारतीय संघाची घोषणा महाराष्ट्राच्या अक्षय भांगरे, सुयश गरगटे व अनिकेत पोटे, प्रियंका इंगळे, गौरी शिंदे व अपेक्षा सुतार यांची भारतीय संघात निवड महाराष्ट्राच्या डॉ. चंद्रजीत जाधव व सचिन गोडबोले यांची उपसमितीवर निवड

                                                                         

क्रीडा विभाग

डावीकडून: सुयश गरगटे व अनिकेत पोटे, प्रियंका इंगळे, अपेक्षा सुतार, गौरी शिंदे व अक्षय भांगरे.

 डॉ. चंद्रजीत जाधव

सचिन गोडबोले 


फलटण टुडे (मुंबई, १९ मार्च , क्री. प्र.)
 ४ थी आशियाई खो-खो स्पर्धा तामूलपूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गुवाहाटी, आसाम येथे आजपासून २३ मार्च पर्यन्त होत आहे. या स्पर्धेसाठीचा भारतीय संघाची घोषणा भारतीय खो-खो महासंघाचे सेक्रेटरी एम. त्यागी यांनी आज केली. भारतीय संघाच्या निवडीत महाराष्ट्राचे सरचिटणीस गोविंद शर्मा (निवड समिति सदस्य) यांनी विशेष भूमिका बजावली. तर या स्पर्धेसाठी खो-खो फेडरेशन ऑफ इंडियानच्या वतीने महाराष्ट्रातील डॉ. चंद्रजीत जाधव व सचिन गोडबोले यांची उपसमितीवर निवड करण्यात आली आहे.  

भारतीय पुरुष संघ : अमित पाटील, अक्षय गणपुले व अरुण गुणकी (सर्व रेल्वे), अक्षय भांगरे, सुयश गरगटे व अनिकेत पोटे (सर्व महाराष्ट्र), अवधूत पाटील (कोल्हापूर), एम. के. गौतम (कर्नाटक), ए. एस. एन. आगिरेड्डी (आंध्र प्रदेश), मदन (दिल्ली), एस. संथरू (तामिळनाडू), व्ही. कबिलन (पुदूचेरी), सचिन भारगो (मध्य भारत), आकाश (उत्तर प्रदेश) व मुकेश (राजस्थान) राखीव : सुभम काची (मध्य प्रदेश), सीबीन एम. (केरळ) व ध्रुव (हरयाणा).

भारतीय महिला संघ : प्रियंका इंगळे, गौरी शिंदे व अपेक्षा सुतार (सर्व महाराष्ट्र), निकिता पवार (भारतीय विमान प्राधिकरण), परविन निशा (दिल्ली), एल. मोनिका (कर्नाटक), बिन्दु (हरयाणा), निर्मला भाटी (राजस्थान), गुरवीर कौर (पंजाब), अर्चना माझी (ओडिशा), दीपिका चौधरी (पी. बंगाल), मीनू (हरयाणा), रंजना (आसाम), नसरीन (भारतीय विमान प्राधिकरण) व मधु (दिल्ली) राखीव : रीहका (मध्य भारत), मोनिका (बिहार) व रेश्मा राठोड (महाराष्ट्र).    

या स्पर्धेत यजमान बलाढ्य भारतासह, नेपाळ, भुतान, बांगलादेश, मलेशिया, इराण, द. कोरिया, श्रीलंका व इंडोनेशिया असे नऊ संघ स्पर्धास्थळी दाखल झाले असून इराक व पाकिस्तान या संघांना सरकारी परवानगी न मिळाल्याने हे संघ स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे भारतीय खो-खो महासंघाचे सेक्रेटरी एम. त्यागी यांनी कळविले आहे. या स्पर्धेत इराणचा पुरुषांचा तर मलेशियाचा महिलांचा संघ सहभागी होणार असून इतर सर्व देशांचे पुरुष-महिला दोन्ही संघ सहभागी होत आहेत. हि स्पर्धा सुरवातीला साखळी पध्दतीने व नंतर बाद पध्दतीने खेळवली जाणार आहे.

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!