कुरवली खु. विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी कुरवली खु. ता.फलटण जि. सातारा या संस्थेची पंचवार्षीक निवडणूक सन २०२२ – २३ ते २०२७ – २८ या पंचवार्षीक निवडणूकीत सत्ताधारी राष्ट्रवादी पुरस्कृत श्री रामराजे पॅनल ने विरोधी पॅनलचा १३ – ० असा धुव्वा उडवला .
यावर्षी कुरवली खुर्द सोसायटी ९३ वर्ष पूर्ण करत असून या विकास सोसायटी वरती सत्ताधाऱ्यांनी सर्वच्या सर्व १३ जागा जिंकत वर्चस्व मिळवले व विरोधकांचे पानिपत करत गुलालाची उधळण करत विजय उत्सव साजरा केला.
या सोसायटी ची स्थापना स्वातंत्र्य पूर्व काळात सन १९३० साली झाली असून यावर्षी सोसायटीने ९३ व्या वर्ष पूर्ण केली असून या विकास सोसायटी वरती सत्ताधारी राजेगटाचे वर्चस्व गेली अनेक वर्ष आहे .
या निवडणूकीत एकुण ९०० मतदाना पैकी ७२९ मतदान झाले त्यामधे निवडून आलेले उमेदवार व त्याना पडलेली मते पुढील प्रमाणे
*सर्वसाधारण मतदारसंघातून खालीला प्रमाणे निवडून आलेले उमेदवार*
१ घनवट बापू सखाराम 383 मते
२ निंबाळकर हेमंत जयवंत 380 मते
३ तोडकर कृण्णात सयाजी 368 मते
४ ननावरे शिवाजी संतरामान 365 मते
५निंबाळकर संपत माधवराव 365 मते
६ घनवट मारुती जगू 352 मते
७ घनवट नागनाथ संभाजी 347 मते
८. बंडगर दादा आप्पा 347 मते
*महिला राखीव मतदारसंघ*
१ घनवट लिलाबाई दादा.419 मते
२ निंबाळकर रेखा प्रकाश 405 मते
*अनु.जाती/जमाती राखीव मतदारसंघ*
१ अहिवळे बापू दिनकर 419 मते
*वि.जा./भ.ज. राखीव मतदारसंघ*
१ पिसाळ ब्रम्हदेव रामू 397 मते
*इतर मागास वर्ग राखीव मतदारसंघ*
१ घनवट सचिन चंद्रकांत. 421 मते
निवडून आलेले आहेत.
निवडूण आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन महाराष्ट्र राज्य विधान परिषद मा. सभापती तथा विद्यमान विद्यान परिषद सदस्य आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा सातार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले .
चौकट :
या निवडणूकीत राष्ट्रवादी पुरस्कृत श्री रामराजे पॅनल मध्ये इतर मागास वर्ग राखीव मतदारसंघातील उमेदवार श्री सचिन चंद्रकांत घनवट यांनी सर्वाधीक ४२१ मते घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवारावर मोठ्या फरकाने विजय मिळवीला .

सर्वाधिक मते मिळवून विजय मिळवील्या बद्दल श्री सचिन घनवट यांचे अभिनंदन करतान श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , विवेक शिंदे व इतर मान्यवर