फलटण टुडे (सातारा, दि. 17 ) :-
मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्यावतीने दि. 24 मार्च 2023 रोजी दुपारी 3 वा. मुख्य पोस्ट मास्तर जनरल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये 122 वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तू/मनी ऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असवा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव व हुद्दा इत्यादी.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज.शि.) आणि सचिव डाक अदालत मुख्या पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय मुंबई, एनेक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्पलेक्स, 4 था मजला, मुंबई – 400001 यांचे नावे दोन प्रतीसह दि. 17 मार्च 2023 पर्यंत पोहचतील अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांनी कळवले आहे.