श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

फलटण टुडे । फलटण । 

श्री स्वामी समर्थ महाराजांचा 167 वा प्रकट दिन गुरुवार, दि.23 मार्च रोजी संपन्न होत असून यानिमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, (गजानन चौक, अहिल्यानगर) फलटणच्यावतीने विविध कार्यक्रमां चे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, दि.22 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त स.5:30 ते 7 श्रीं च्या मूर्तीस अभिषेक, त्यानंतर श्रींची महाआरती होणार असून सकाळी 9 ते सायं.6 या वेळेत रक्तदान व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7:30 वा. श्रींची महाआरती होवून रात्री 9 ते 11 या वेळेत ह.भ.प. जगन्नाथ महाराज खरात यांचा विनोदी व धार्मिक नाथ पारंपारिक भारूडाचा कार्यक्रम होणार आहे.

दि.23 रोजी प्रकटदिनी स.5 ते 7 श्रीं चा अभिषेक, स.7:30 ते 8 महाआरती, स.9 ते सायं.6 रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर, स.10 ते दु.12 झी टॉकीज फेम ह.भ.प.मधुकर महाराज गिरी यांचे किर्तन, दु.1 ते 3 महाप्रसाद, सायं.5 ते 7 भजन, सायं.7:30 वा.महाआरती, रात्री 8 ते 9 प्रसाद व रात्री 10 ते 12 एकतारी भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून रक्तदान शिबीरातील रक्तदात्यास एक रोप व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. रक्तदान व नेत्र शिबीरात सहभागी होवू इच्छिणार्‍यांनी संजय चोरमले (9405590976), सौरभ बिचुकले (9637294247), कुणाल वाघ (7887838970), प्रसाद दळवी (9860732038) यांना संपर्क साधण्याचे आवाहनही मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!