जुनी पेन्शनसाठी फलटणमधील राज्य सरकारी कर्मचारी संघटना एकवटल्या

तहसीलदार समीर यादव यांना जुनी पेन्शन योजनलागू करावी यासाठी निवेदन देतना विविध संघटनेचे पदाधिकारी व इतर मान्यवर

फलटण टुडे (फलटण दि १४) : –
सरकारला आलंय टेन्शन द्यावी लागंल जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, जुनी पेन्शन न देणाऱ्या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची.. अशा घोषणांनी अख्खे फलटण दणाणून सोडत शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विराट मोर्चा काढत मंगळवारी सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला.  

भर दुपारी उन्हाच्या तडाख्याची पर्वा न करता हाजारो च्या वर सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले. ही सुरूवात आहे..आता पेन्शन घेतल्या शिवाय माघार नाही असा निर्धार यावेळी करण्यात आला.जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी गेली अनेक वर्षे शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षकांचा लढा सुरू आहे. त्यासाठी १४ मार्चपासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर फलटणमधील राज्य सरकारी निमसरकारी,, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , नगरपरिषद कर्मचारी , अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी संघटना , समन्वय समिती महाराष्ट्र संघटना समन्वय समिती सातारा यांच्या वतीने आज फलटण तहसील कार्यालयावरती जुनी पेन्शन मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आले.

 या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील विविध २८ संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे यामध्ये प्रामुख्याने महसूल कृषी शिक्षण ग्रामसेवक संघटना तलाठी संघटना आरोग्य सेवक संघटना भूमी अभिलेख कनिष्ठ अभियंता पशुसंवर्धन विभाग माध्यमिक विभाग शिक्षण बहुसंख्येने महिला कर्मचारी पेन्शन फायटर ,
समन्वय समिती व जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होते.

 सकाळी ११ : ३० वाजता मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा पंचायत समिती पासून बिडीओ साहेबांना निवेदन देऊन अधिकारगृह येथील तहसिलदार कार्यालकडे निघाला एकच मिशन जुनी पेन्शन लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या घालून कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते. यात महिलांचा सहभाग उत्स्फूर्त असा होता. भर दुपारच्या १२ वाजण्याच्या सुमारास तो अधिकारगृह येथे पोहचला.

 उन्हामुळे रस्त्यांवर तुलनेने गर्दी कमी होती पण मोर्चामुळे शहरातील चौक पॅक झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ चौक, डेक्कन चौक, महात्मा ज्योतीराव फुले चौक ते तहसील कार्यालय असा मोर्चाचा मार्ग होता. या मार्गाला लागून असलेल्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर येथे मान्यवरांची भाषणे झाली.

यानंतर तहसीलदार समीर यादव यांना विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून निवेदन देण्यात आले . त्यानंतर तहसीलदार साहेबांनी संपात असणाऱ्या लोकांसाठी दरबार हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल समितीच्या वतीने फलटण तालुका समन्वय समितीच्या वतीने साहेबांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले . 

यानंतर पेन्शन फायटर संघटनांच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आली जोपर्यंत शासन दरबारी जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप चालू राहील असा दृढ निश्चय उपस्थित सर्वांनी केला . यावेळी शारीरिक शिक्षक संघटना फलटण यांच्यावतीने संपाला पाठिंबा देण्यात आला .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!