मधमाशीला राज्य कीटकाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणार : रवींद्र साठे

फलटण टुडे (सातारा दि. 12 ) : 
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महाराष्ट्र राज्य औषधी वनस्पती मंडळ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय मधूमक्षिका पालन व मध अभियान अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा मध संचालनालय , महाबळेश्वर येथे संपन्न झाली. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी मधमाशीला राज्य कीटकाचा दर्जा मिळावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून मध माशीचे पर परागी करणाद्वारे होणारी कृषी उत्पादनातील वाढ व त्यामधे मध माशांचे अनंन्य साधरण महत्व लक्षात घेता मधमाशी उद्योग महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन केले.

 यावेळी उपस्थित शेतकरी मध पालनांना संबोधित करताना साठे म्हणाले की राज्य शासनाची मध केंद्र योजना सर्व समावेशक व सर्व घटकांसाठी असून ५० टक्के अनुदान देण्यात येते. लाभार्थीनी उत्पादित केलेल्या मध व मेणाची खरेदी मंडळ हमी भावाने करत आहे.नुकतेच मंडळाने खरेदीचे हमी भावात भरघोस वाढ केली असून आता सेंद्रिय मध खरेदी दर रू.४००/- वरून रू.५००/- , सातेरी मध खरेदी दर रू.३४५/- वरून रू.४००/- तर मेण खरेदी दर रू.१७०/- वरून रू.३००/- प्रती कीलोग्रम , मेलिफेरा मधाचे दरही वाढविण्यात आला आहे .

सातेरी मध माशा वसाहती खरेदी दर रू.२७००/- वरून रू ३०००/- प्रती वसाहत या. प्रमाणे खरेदीचा दर वाढविण्यात आल्याची घोषणा केली व जास्तीत जास्त मधपालनांनी मंडळाकडे मध विक्री करावा असे आवाहन केले.

महाराष्ट्र राज्य औषधी वनस्पती मंडळ पुणेचे उप संचालक प्रवीण गवांदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या व केंद्र सरकारच्या विविध योजनां बद्दलची माहिती दिली.कृषी विभाग अंतर्गत मधूक्रांती पोर्टल द्वारे ऑन लाईन नाव नोंदणी करून केंद्र सरकारच्या मध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

 संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील म्हणाले की मध उद्योगाला खऱ्या अर्थाने चालना मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी मधमाशी पालन करणे व त्यांचे संवर्धन करणे फार महत्त्वाची गोष्ट आहे.या कार्यक्रमास उपविभागीय कृषि अधिकारी वाई तेजदीप ढगे, तालुका कृषी अधिकारी नितीन पवार, तंत्र अधिकारी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय सातारा समीर पवार, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी निसार तांबोळी, अध्यक्ष मधुसागर संजय पारटे, अध्यक्ष मधाचे गाव समिती नाना जाधव,श्री. नारायणकर ,सौ. शारदा अनिल बावळेकर , सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे २०० मधपाल ,शेतकरी उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात, प्रा.हेमंतकुमार डुंबरे यांनी मध माशा व्यवस्थापन ,श्री. आर.पी.नारायणकर यांनी राज्यातील मध योजना, सौ. शारदा अनिल बावळेकर यांनी मध माशा पालनातील उप उत्पादने, श्री.संजय कांबळे यांनी मध प्रक्रिया, मधाची साठवणूक व निगा राखणे ई.विषयावर व्याख्यान दिले विजय कुंभरे यांनी मध माशा संगोपन प्रात्यक्षिक दाखवली.

यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप व अर्थ सल्लागार व मुख्य लेखाधिकारी विद्यासागर हिरमुखे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील यांनी केले तर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तांबोळी यांनी आभार मानले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!