फलटण येथील डॉ. वासंती महामुलकर यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

 

फलटण टुडे (सातारा दि. 10 ): 
फलटण येथील डॉ. वासंती संपतराव महामुलकर यांना समाज सेवेतील त्यांच्या कार्याबद्दल सन 2014-15 या वर्षाकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. मुंबई येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. 8 मार्च 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नैसिर्गिक, गॅस व पेट्रोलियम, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

गेटवे ऑफ इंडया, मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमास विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर, महिला व बाल कल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. एस. कुंदन, महिला व बाल विकास आयुक्त आर. विमला यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.

श्रीमती महामुलकर यांना शासनाचे सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, रोख 1 लाख रुपये, शाल व श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्रीमती महामुलकर यांचे नातेवाईक आणि महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, जिल्हा परिविक्षा अधिकारी अतिष शिंदे, जिल्हा संरक्षण अधिकारी चेतन भारती आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा व स्वातंत्र्य संग्रामाचा उज्वल इतिहास तसेच प्रेरणादायी महिलांना सलाम करणारी एक विशेष चित्रफीतही दाखविण्यात आली.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!