**
राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कु. साक्षी जाधव हिचा विजेत्या चषकासह सत्कार करतान
प्राचार्य डॉ सागर निंबाळकर
फलटण टुडे (फलटण):
फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, फलटण आयोजित २०२२-२३ च्या श्रीमंत शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे संपन्न झाल्या.
सदर राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील व्दितीय वर्षातील कुमारी साक्षी धैर्यशील जाधव या विद्यार्थ्यानीने विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान या विषयावर विचार व्यक्त करून राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला व महाविद्यालयाचे नावलौकिक वाढविले. सदरील राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे सहायक प्राध्यापक अजिंक्य रासकर, प्रा.आशिष फडतरे, प्रा.धनश्री निकम, प्रा.अजिंक्य ओतारी लाभले.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा.ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशचे अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारचे माजी अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे मे गव्हर्निंग कौन्सिलचे सभासद सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, अधिक्षक श्री. श्रीकांत फडतरे यांनी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील विद्यार्थिनीने राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकाविल्या बद्दल विद्यार्थिनीचे व प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.