**
जागतिक महिला दिनी राजमाता जिजाऊसाहेब आणि क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करताना प्राचार्य डॉ सागर निंबाळकर व इतर मान्यवर
फलटण टुडे ( फलटण ) :
‘जागतिक महिला दिन’ (International Women’s Day) हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित केला जातो, लिंग समानतेचे महत्व पटवून देण्यासाठीदेखील हा दिवस साजरा केला जातो. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात राजमाता जिजाऊसाहेब आणि क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रिय सेवा याजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश बिचुकले यांनी जागतिक महिला दिनाची एतिहासिक पार्श्वभूमी,अमेरिका आणि युरोपसहित संपूर्ण जगभरातील स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत मतदानाचा नाकारलेला हक्क, अन्यायाविरुद्ध स्त्रियांचा संघर्ष या विषयावर उपस्थित महिला कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक यांना प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी समाजातील असणारे महिलांचे हक्क, आधुनिक युगातील महिलांचा संघर्ष, महीलांची कार्यालयीन कामकाजातील सुरक्षितता, लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क तसेच महिलांच्या हक्काचा दिवस म्हणजेच जागतिक महिला दीन, महिलांचे आर्थिक सबलीकरण या विषयावर उपस्थित महाविद्यालयातील प्राध्यापिका वर्ग, महिला कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवीका यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील सर्व महिला प्राध्यापिका वर्ग, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवीका विद्यार्थिनी यांनी उतस्फुर्तपणे सहभाग दर्शविला. सदर कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर तरटे यांनी व्यक्त केले.