बुधवार दि . 8 मार्च 2023 रोजी मुधोजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाईसाहेब महिला प्रशिक्षण केंद्रमार्फत विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याबरोबरच महिलांच्या विविध अभिव्यक्तीला संधी मिळावी या हेतूने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये आठ मार्च रोजी विजयमाला पुरस्कार वितरण सोहळा माननीय श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर सेक्रेटरी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुखातिथी स्वाती पाटणकर निवेदिका दूरदर्शन व आकाशवाणी पुणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. श्रीमंत अनंतमालादेवी बाईसाहेब महाराज नाईक निंबाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ उद्योग व्यवसाय व राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा, शिक्षण,वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार प्रदान करताना स्वाती पाटणकर यांनी महिला आपला नसून सबलाच आहेत केवळ त्यांनी स्वतःला असणारे धोके ओळखून प्रत्येक गोष्टीला सामोरे गेल्यास कोणत्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही किंबहुना महिला जबाबदारीने वागल्या तर त्यांना कोणीही समजणार नाही असे प्रतिपादन केले तर अध्यक्ष स्थानावरून बोलताना आमदार दीपकरावजी चव्हाण यांनी प्रदीप भिडे व स्वाती पाटणकर या सह्याद्री वाहिनीच्या वृत्त निवेदकांचे त्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन करून फलटण सारख्या ठिकाणी येऊन आपण फलटणकरांशी संवाद साधल्याबद्दल कौतुक केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य यानी केले कार्यक्रमाला माननीय रमण सेठ दोशी, हेमंत रानडे,भोजराज नाईक निंबाळकर ,वसुंधरा नाईक निंबाळकर,रणजीत निंबाळकर, श्रीकांत फडतरे , व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.