सुवर्ण पदक विजेत्या ओम शिंदे व ओंकार दाणे यांचा सत्कार करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर
फलटण टुडे (फलटण) :
विद्यापीठ स्तरावरील राष्ट्रीय सांस्कृतिक युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे कलाविष्कार विभागाचे दोन विद्यार्थी सहभाग असणाऱ्या लोकनृत्य व सांस्कृतिक दिंडी प्रकारामध्ये सुवर्णपदकाचे मानकरी ठरले व लोकसंगीत वाद्यवृंद मध्ये कांस्य पदक प्राप्त झाले. त्याबाद
शिवाजी विद्यापीठाच्या संघातून सहभागी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतीक युवा महोत्सवात फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील कलाविष्कार विभागातील ओम शिंदे व ओंकार दाणे या दोन विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक दिंडी व लोकनृत्य स्पर्धेत सुवर्णपदक तसेच लोकसंगीत वाद्यवृंद कलाप्रकारात कांस्यपदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघात यादोघांचा समावेश होता सदर स्पर्धा अखिल भारतीय विशवविद्यालय राष्ट्रीय युवा महोत्सव जैन विद्यापीठ, बेंगलोर कर्नाटक येथे संपन्न झाल्या.
सदर विदयार्थ्यांनी गणपत विद्यापीठ, गुजरात आयोजित पश्चिमविभागीय राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. लोकनृत्य ,लोकसंगीत वाद्यवृंद , तसेच सांस्कृतिक दिंडी या कलाप्रकारात आपला डंका कायम ठेवला.