**
फलटण टुडे ( फलटण ) :
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण, पदविका विभाग, विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परिषद, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रम मध्ये कु. आर्या सतीश शहा हिने ९०टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय वर्षामध्ये कु. अश्विनी हपन हिने ८६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तृतीय वर्ष पदविका मध्ये कु. काजल दिलीप गुंजाळ हिने ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मेकॅनिकल विभाग, पदविका अभ्यासक्रम, प्रथम वर्षा मधुन कु. पायल सचिन बनकर हिने ७७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय वर्षात कु. गायकवाड शरण्या ज्ञानेश्वर, ८०.३२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तृतीय वर्ष कु. भोसले भक्ती वसंत, ८०.३८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.नरेंद्र नार्वे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.