फलटण टुडे (फलटण) :
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर येथे जागतिक महिला दिनानिमित्त संगीत खुर्चीचे आयोजन केले होते. त्यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व पालकांनी सहभाग घेतला होता यात इ.१ली,२री तीन क्रमांक सौ.अश्विनी संतोष सोळसकर प्रथम क्रमांक,सौ. दिपा अभिषेक दोशी द्वितीय क्रमांक,सौ.सोनाली उमेश रणदिवे तृतीय क्रमांक तसेच इ.३री , ४थी तीन क्रमांक सौ. अश्विनी योगेश शिंदे प्रथम क्रमांक,सौ. पूजा दत्ता भोसले द्वितीय क्रमांक,सौ. रुपाली ज्ञानदेव नरुटे तृतीय क्रमांक यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
तसेच जिल्हास्तरीय महिला कुस्ती स्पर्धा २०२३-२४चे
उदघाटन मा. श्री दिपक चव्हाण आमदार यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. प्रगती जगन्नाथ कापसे मा. नगरसेविका, प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री बापूराव लोखंडे (महाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते),मा.श्री पांडुरंग गुंजवटे, मा. नगराध्यक्ष,मा.श्री दत्तात्रय गुंजवटे मा.सभापती पंचायत समिती फलटण,मा.प्रा. डॉ. पंढरीनाथ कदम प्राचार्य मुधोजी महाविद्यालय फलटण मा.श्री रामदास कदम संचालक मार्केट कमिटी फलटण ,भाऊ कापसे ,मा. श्री सुदामराव मांढरे मा. नगरसेवक,मा.श्री किशोर (गुड्डू)पवार मा. नगरसेवक मा. श्री किशोरसिंह (भैय्या) ना.निंबाळकर मा.नगरसेवक ,मा.श्री एम. के. कदम सर, मा. पै. पप्पुभाई शेख , मा.श्री रमेश चव्हाण ता. अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, मा.श्री अजय कदम, मा. पै.धनराज पवार (दादा), मा.श्री राहुल सरक म. चॅम्पियन, मा.श्री रमजान शेख तिरंगा हॉटेल उद्योग समूह निंभोरे, प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री रूपेश शिंदे सर, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, कुस्ती स्पर्धक, विद्यार्थी,पालक,आदी उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन कुस्ती कोच सो अनिता गव्हाणे मॅडम व गिरवीचे उपसरपंच श्री.मदने यांनी केले होते.तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रशालेच्या उपशिक्षिका सौ.सुर्यवंशी मॅडम यांनी केले तसेच मा.श्री साबळे सर यांनी आभार व्यक्त केले.