फलटण टुडे (गोखळी प्रतिनिधी) :
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदा २३ वा श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.बीज उत्सवाच्या निमित्ताने श्री संत तुकाराम गाथा पारायण ह.भ.प. गोविंद गावडे महाराज यांनी वाचन केले. युवा किर्तनकार ह.भ.प.श्रीराम गुलदगड महाराज यांचे किर्तन झाले.या उत्सवासाठी एन.के.आटोळे, भगतसिंग गोविंद गावडे, राधेश्याम नानाभाऊ गावडे यांनी अन्नदान केले. बीज उत्सवास फलटण पूर्व भागातील खटकेवस्ती,पवारवाडी,साठे,गुणवरे, तसेच मेखळी,घाडगेवाडी ता.बारामती परीसरातील भाविकांनी दर्शन घेतले.