पद्मश्री गिरीश प्रभुणे, सौ. तृप्ती देसाई यांचे हस्ते सन्मान स्विकारताना सौ. निलम साळवे व नितीन साळवे.
फलटण टुडे ( गोखळी दि. ८ ) :
दि ब्रेन ब्राउझर अबॅकस अँड वैदिक मॅथस या कंपनीच्या संस्थापक, मातोश्री रमाबाई आंबेडकर आश्रम शाळा थेऊर येथे कार्यरत सौ. निलम नितीन साळवे यांना महाराष्ट्र स्टार हिरकणी सन्मान २०२३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
मातृसेवा सेवाभावी संस्था चिंचवड पुणे, दक्ष फाऊंडेशन महाराष्ट्र आणि तेजस्विनी सामाजिक शैक्षणिक विकास संस्था सातारा यांच्या संयुक्त सहभागाने पुणे येथे आयोजित आत्मनिर्भर लक्षवेधी संमेलना मध्ये पद्मश्री गिरिश प्रभुणे व भू – माता ब्रिगेडच्या संस्थापिका सौ. तृप्ती देसाई यांच्या हस्ते सदर पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सदैव पुढाकार घेऊन काम करीत असलेल्या सौ. नीलम साळवे यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल यांचे फलटण, बारामती, पुणे, सातारा परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.