फलटण टुडे (फलटण टुडे ) :
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभागीय कार्यालय व फलटण शहर शाखेच्या वतीने बुधवार दि.08 मार्च रोजी विभागीय कार्यालय फलटण येथे महिला मेळाव्याचे आयोजन करणेत आले होते.सदर मेळाव्यास मुख्य कार्यालय अकाऊंट विभागाचे उपव्यवस्थापक श्री. निकम साहेब,विभागीय विकास अधिकारी श्री.निंबाळकर साहेब,श्री. खलाटे साहेब,फलटण शहर शाखाप्रमुख श्री. गायकवाड साहेब, श्री. मेहता साहेब व शाखा फलटण शहर बरोबरच शहर परिसरातील इतर सर्व शाखांचा महिला स्टाफ उपस्थित होता.
सुरुवातीला सौ.आत्तार मॅडम यांनी उपस्थित महिलांचे स्वागत करून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.त्यानंतर सौ.कदम मॅडम यांनी उपस्थित महिलांना pmsby व pmjjby , अपघात विमा याबाबत सखोल माहीती दिली.माननीय निकम साहेब यांनी त्यांच्या भाषणांत बँकेच्या स्थापनेपासून चा इतिहास थोडक्यात विशद केला व महिला बचत गटाची व कर्ज योजनेची माहिती दिली.त्यानंतर सौ. गोसावी मॅडम यांनी बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांची माहिती देऊन सदर योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.शेवटी मा. निंबाळकर साहेब यांनी उपस्थित महिलावर्गाचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.त्यानंतर बँकेच्या वतीने उपस्थित महिलांचा यथोचित सत्कार करणेत आला व अल्पोपहार देणेत आला.कार्यक्रमात महिलांना विमा योजनेची पत्रके वाटनेत आली.सदर कार्यक्रमास शाखा कार्यक्षेत्रातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.