आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर ता. फलटण हि सामाजिक संस्था गेली ५ वर्ष विविध उपक्रम राबवत असून जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील अनेक महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना “कर्तृत्वान महिला पुरस्कार” आज जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ऑनलाईन द्वारे देण्यात येणार आहे.
समाज हितासाठी कार्य करण्याची भक्ती आणि तुम्हाला सदैव प्रेरणा देणारे तुमची स्त्री शक्ती यांचा आम्ही आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मानपत्र देऊन गौरव करीत आहे.
लाभे स्त्री शक्तीचे वरदान
दातृत्व कर्तृत्व महान
व्हावी जगी कीर्ती
तू नवशक्ती मांगल्यमूर्ती
या व्यक्तीप्रमाणे खालील महिला भगिनींना पुरस्कार देण्यात येत आहे.
यामध्ये सौ.कुसूम चंद्रकांत मेरुकर ता.जावली, सौ.मृणाल धनंजय जाधव ता.खंडाळा, सौ.निता भगत कांबळे ता.पाटण. डॉ. लीना सतीश निकम नागपूर, सौ.अंजली रविकरण दीक्षित संभाजीनगर, मीनाक्षी कुंडलिक जाधव ता. खटाव, सौ. विद्या गणेश लोखंडे ता.कोरेगाव, सविता सचिन शिरसागर ता.वाई, ज्योती बाबुराव कदम ता. कराड ,माधुरी अरुणराव वाघमारे ता.माण, अलमास अमर मुलाणी ता.सातारा, ज्योती श्रीरंग कदम ता.महाबळेश्वर तसेच फलटण तालुक्यातील आशा शंकरराव पिसाळ वाजेगाव, सीमा देवराव मदने जुनागाव वाठार निंबाळकर, राजश्री संभाजी कुंभार सुरवडी, रुकसाना जाकीरहुसेन संदे खडकी, लतिका हरिभाऊ अनपट मुधोजी हायस्कूल ,प्रतिभा दत्तात्रय घाडगे,तरडगाव
इ.महिलांचा मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. अशी माहिती आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकरचे संस्थापक अध्यक्ष श्री.गणेश तांबे व सचिव सौ.जयश्री तांबे यांनी दिली आहे. २१व्या शतकाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला उत्कृष्ट अशा कार्य करत आहेत अशा कार्याची दखल घेऊन त्यांचा उचित सन्मान केल्यानंतर त्यांना कार्य करण्याची प्रेरणा मिळते. आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर हे नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्यामुळे जिल्ह्यातून अशा उपक्रमाचे कौतुक होत आहे.