फलटण टुडे (बारामती ):
वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर येथे १९७८-७९ साली इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी प्रथमच वर्षांनी एकत्र आले होते. त्यापैकी तुकाराम पवार, मोहम्मद शेख, विद्या पवार, सुरेश गायकवाड, अशपाक आतार, जयराम पवार यानी एकत्र येऊन त्यांच्या संपर्कातील मित्रांचे नंबर मिळवून सर्वांना स्नेह मेळाव्या साठी एकत्र येण्याचे आव्हान केले.
तसेच अशोक नवले, बाळासाहेब हिरवे यांनी त्यांच्या संपर्कातील आपल्या गुरुजनांना भेटून आणखी काही सरांचे नंबर घेऊन त्यांनाही स्नेहमेळाव्याचे निमंत्रण दिले. अशा पध्दतीने जवळपास ७० ते ७२ मित्र व त्यांचे ९ गुरुजी तब्बल ४३ वर्षांनी एकत्र आले. सर्वांनी मिळून बारामती येथील १० फाटा होळ येथील कार्यालय घेऊन स्नेह मेळावा व्यवस्थितपणे पार पाडला.
त्यानंतर दुसरा स्नेह मेळावा यवत येथे पार पडला. तिसरा मेळावा हैद्राबाद येथे घेण्याचे ठरलेवरुन सर्वानुमते तारीख फायनल पवार, काझी सर, विद्या पवार, नेहा गुरव यानी करून पुणे ते पुणे ए.सी. रेल्वेने प्रवास केला. हैद्राबाद येथील सुप्रसिद्ध बिर्याणी, चारमीनार, स्टॅच्यू ऑफ इक्व्यालिटी रामानुजन, बिर्ला टेंपल, हुसेन जलसागर, लेजर शो, एन टी गार्डन सालारजंग म्युझीअम, रामोजी फिल्म सिटी व शेवटच्या दिवशी ३२७ किमी अंतर कापून हैदराबाद ते श्रीशैल्यम असा प्रवास करून भारतातील १२ ज्योतीर्लिंगपैकी एक ज्योतीर्लिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवजयंतीच्या दिवशी भारतातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिरात जाऊन महाराजांचे दर्शन देखिल घेतले.
या स्नेह मेळाव्यात मालती पखाले, अंजना गाडेकर, संगीता सुरवसे, महम्मद शेख, हर्षदा जगताप ऐनवेळी ओंकार पवार, डॉ. स्नेहल पवार सहभागी होऊन अत्यंत खेळीमेळीत स्नेह मेळावा पार पडला. यासाठी होटेल व्यवस्था, पुर्णप्रवास, लोकल बस इ. साठी विशेष प्रयत्न तुकाराम पवार यांनी घेतले.