उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण
फलटण टुडे :
जिल्ह्यातील वाढती अपघातांची संख्या पाहता याविषयी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अपघातांची संख्या कमी करणे. तसेच रस्ते सुरक्षेमध्ये वाढ करणे हा या उपाययोजनांचा उद्देश आहे. अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे जिल्ह्यासाठी उपाययोजना केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.
ज्या ठिकाणी वारंवार अपाघात घडतात अशा ब्लॅकस्पॉटनिहाय अधिकारी यांची नेमणूक केली. इतर यंत्रणांशी समन्वयातून 42 वरुन 08 इतके ब्लॅकस्पॉट शिल्लक राहिले एकूण 34 ब्लॅकस्पॉट कमी झाले. रस्ता सुरक्षा व इतर कारवाईबाबत लक्षांक साध्य करण्यासाठी विशेष पथकांची निर्मिती व कारवाई. रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे विविध स्तरावर आयोजन. रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला अशा प्रकारचे अभियान राबाविण्यात आले. राष्ट्रीय, राज्य व इतर रस्ते यांच्याबाबत कारावयाच्या उपाययोजना संदर्भात आवश्यक बाबींची पुर्तता करण्यासाठी समन्वय साधून कामकाज केले. अपघात प्रवण क्षेत्रामध्ये अतिवेगाने होणारे अपघात टाळण्यासाठी अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. अशा प्रकारची कारवाई यापुढेही चालू राहणार आहे. तालुकनिहाय मोटार वाहन निरीक्षक यांची नियुक्ती करुन संपूर्ण रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्याबाबतच्या उपाययोजनांसाठी संबंधित विभागास कळविण्यात आले आहे. माहे जानेवारी 2022 व जानेवारी 2023 मधील अपघाताचे विश्लेषण करुन कारणे, ठिकाण व त्यामधील घटकांचा अभ्यास करुन त्या त्या महिन्यामध्ये अंमलबजावणीबाबत दिनांक निहाय कार्यक्रम आखणी व अंमलबजावणी करण्यात आली आहे.
*सातारा जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी*
1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या दरम्यान जिल्ह्यात 483प्राणांतिक अपघात झाले आहेत. 355गंभीर इजा, 47जणांना किरकोळ इजा, कोणतीही इजा नाही 59 असे एकूण 944 अपघात झाले आहेत.
प्राणांतिक अपघात व त्याव्यतिरिक्त अपघात यांची तुलना करता प्राणांतिक अपघात हे 51 टक्के तर त्याव्यतिरिक्त 49 टक्के अपघात आढळून येतात. शहर व ग्रामीण भागाचा विचार करता शहरी भागात 25.6 टक्के तर ग्रामीण भागामध्ये 74.4 अपघात घडल्याचे दिसून येतात. अपघातामधील वाहनांचा विचार करता जवळपास 50 टक्के अपघातामध्ये दुचाकी वाहनांचा समावेश आहे. चारचाकी वाहनांचा 26 टक्के तर 24 टक्के अपघातामध्ये अवजड वाहने व इतर यांचा समावेश आहे. अपघाताच्या वेळेनुसार विश्लेषण करावयाचे झाल्यास 55 टक्के अपघात हे दिवसावेळी (सकाळी 6 ते सायंकाळी 6) घडल्याचे दिसून येतात. तर 31 टक्के अपघात हे रात्री (सायंकाळी 6 ते रात्री 12 वा. ) दरम्यान. 14 टक्के अपघात हे पहाटे (रात्री 12 ते सकाळी 6 वा.) दरम्यान दिसून येतात. रस्तेनिहाय अपघाताची आकडेवारीचा विचार करता सर्वाधिक अपघात हे राज्य मार्गावर त्यांनतर इतर रस्ते व तुलनेने कमी अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर झाल्याचे दिसून येते. पादचारी व सायकलस्वार यांचे अपघाताच्या प्रमाणाचा विचार करता 95 अपघतामध्ये पादचारी यांचा समावेश आहे तर 19 अपघातामध्ये सायकलस्वार यांचा समावेश होतो. एकूण अपघाताच्या जवळपास 20 टक्के अपघातामध्ये पादाचारी व सायलस्वार यांचा समावेश होतो.
जानेवारी 2022 व जानेवारी 2023 यांचा तुलनात्मक विचार करता जानेवारी 2022 मध्ये एकूण 81 अपघात झाले. प्राणांतिक अपघात 33 तर मृत्यूमुखी संख्या 37 आहे. जानेवारी 2023 मध्ये एकूण 90 अपघात झाले. प्राणांतिक अपघात 43 तर मृत्यूमुख्यी संख्या 47 आहे. अपघातामध्ये 11.11 टक्के वाढ. प्राणांतिक अपघात 30.30 टक्के वाढ तर मृत्यूमुखी संख्येत 27 टक्के वाढ निदर्शनास येते.
रस्त्यांचा विचार करता सर्वाधिक अपघत हे राष्ट्रीय महामार्ग त्यांनतर इतर रस्ते व सर्वात कमी अपघात राज्य महामार्गावर दिसून येतात. अपघातामध्ये समाविष्ट वाहनांचा विचार करता 42 टक्के अपघातामध्ये दुचाकी, 23 टक्के चारचाकी तर 35 टक्के अपघातांमध्ये अवजड वाहने व इतर वाहनांचा समावेश होतो.
वेळेनुसार अपघताचा विचार करता सर्वाधिक अपघात दिवसावेळी घडल्याचे दिसून येते. त्यानंतर अपघात रात्रीच्या वेळी घडल्याचे दिसून येते. सर्वात कमी अपघात पहाटेच्या वेळी घडल्याचे दिसून येते.
सातारा वायुवेग पथकाने 17 हजार 641 वाहनांवर कारवाई करुन तडजोड शुल्कापोटी 327.34 लाख तर कर वसुली 317.41 लाख अशी एकूण 644.75 लाख इतकी रक्कम वसुली केली. कराड वयुवेग पथकाने 4 हजार 973 वाहनांवर कारवाई करुन तडजोड शुल्कापोटी 110.86 लाख तर कर वसुली 31.08 लाख अशी एकूण 171.69 लाखाची वसुली केली आहे.
स्पिडगन केसेसमध्ये सातारा कार्यालयामार्फत 8 हजार 410 तर कराड कार्यालयामार्फत 4 हजार 973 वाहनांवरकारवाई करण्यात आली.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय,
सातारा.