मुधोजी हायस्कूल , फलटण येथे इ.१० वी बोर्ड परीक्षेची बैठक व्यवस्था

फलटण टुडे (फलटण) दि. 27: _

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागातर्फे आयोजित केलेल्या एस.एस.सी बोर्ड परीक्षा मार्च २०२३ ची परीक्षा मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज ,फलटण केंद्र क्र. १००१ येथे दि. ०२ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत होत असून परीक्षा मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे बैठक क्रमांक F024080 ते F024856 या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केलेली आहे. या सेंटरवरती मालोजीराजे विभाग , लक्षीदेवी विभाग , व्यंकटेश विभाग व किशोरसिंह विभाग या चार विभागात बैठक व्यवस्था असणार आहे . या ठिकाणी एकुण 787 रेग्युलर विद्यार्थी व रिपीटर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत . सर्व विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी.

 विद्यार्थ्याने केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश पत्र (रिसीट) / हॉल तिकीट, ओळख पत्र व लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे. उशिरा येणा-या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार
नाही. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमनध्वनी (मोबाईल), टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घडयाळ, पॉकेट कॅलक्युलेटर वा तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने/ उपकरणे परीक्षा केंद्रावर बाळगण्यास सक्त मनाई आहे.

 विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा दयावी. तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केंद्रप्रमुख श्री. एस.एम. काळे व प्राचार्य श्री. बी. एम. गंगवणे, उपप्राचार्य श्री. ए. वाय. ननावरे, श्री. एम.के.फडतरे, पर्यवेक्षक सौ. बगाडे एस.ए., श्री. शिंदे व्ही.जी. यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!