फलटण टुडे (बारामती ):
भारत वर्षात प्रथमच झालेल्या लिंगार्चन आणि लक्षभोजन सोहळ्याची इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली आहे ( सोमवार २० फेब्रुवारी )
शिंगणापूर ( तालुका माण सातारा जिल्हा) येथे 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान तीर्थक्षेत्र फाउंडेशन ने आयोजित केलेल्या भारतातील पहिल्या कोटी लिंगार्चन आणि लक्षभोजन सोहळ्याची नोंद झाली आहे या प्रसंगी देसाई इस्टेट परिवार बारामती यांच्या वतीने नीरज देसाई, संग्राम खंडागळे, अमोल पवार, राहुल वायसे, निलेश पवार, वल्लभ गावडे, यश खत्री,आदीनी सहभाग घेतला होता.
इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड चे राष्ट्रीय सचिव ब्रह्माकुमार डॉ दीपक हरके, मुंबई येथील अतिरिक्त आयकर आयुक्त डॉ नितीन वाघमोडे व ज्योतिषाचार्य पं. अतुल शाश्त्री भगरे याचे शुभ हस्ते तीर्थक्षेत्र फॉउंडेशनचे अध्यक्ष मोहनकाका बडवे, सचिव मंदार बडवे, स्वागताध्यक्ष शेखर मुंदडा, मुख्य समन्वयक अक्षयमहाराज भोसले यांना विश्व विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी चिन्मय बडवे , अनिल बडवे, नागेश बडवे, महेश बडवे, ओंकार बडवे, अजित बडवे, विहान अनिकेत हरके उपस्थित होते.
देशभक्ती व धार्मिक कार्य २१ व्या शतकाकडे जाताना नवीन पिढीला देने गरजेचे असल्याने आशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मुख्य समन्वयक अक्षयमहाराज भोसले यांनी सांगितले