दिखाऊ पेक्षा टिकाऊ वृत्ती बाळगा : शरद तांदळे

डॉ कलाम युथ फौंडेशन चा ‘ युथ व्हिजन 2023’ संपन्न 

शरद तांदळे, कृष्णा खडके, अभिषेक आटोळे व सत्कार मूर्ती आणि इतर


फलटण टुडे (बारामती ): 
आई वडील चे खरे गुरू आहेत त्याचा आदर्श घेऊन भरपूर व योग्य वाचन करा, आपली क्षमता, औकात पाहून व्यवसाय निवडा व यशस्वी कराच व समाज्याला देने लागतो या भावनेने काम करा व दिखाऊ पेक्षा टिकाऊ वृत्तीने काम करा असा सल्ला युवा उद्योजक व सुप्रसिद्ध लेखक शरद तांदळे यांनी दिला.
बारामती येथील डॉ.कलाम युथ फौंडेशन यांच्या वतीने विविध उद्योग, व्यवसायात यशस्वी युवकाचा सत्कार युथ व्हिजन 2023 या कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आला होता या प्रसंगी शरद तांदळे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते .
या प्रसंगी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, युवक शहराध्यक्ष अविनाश बांदल, इंडियन शुगर मिल असोसिएशन च्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ,उद्योजक रणजित शिंदे, सुखदेव हिवरकर आदी मान्यवर उपस्तीत होते.
नौकरीच्या पाठीमागे न लावता स्वतःचा व्यवसाय करून इतरांना रोजगार देऊन गुणवंत व्यवसाईक झालेले युवक हेच खरे आदर्श असल्याचे मान्यवरांनी सांगितले .
डॉ कलाम यांच्या विचारांमुळे प्रभावित होऊन फौंडेशन कार्य करीत असल्याचे कृष्णा खडके यांनी सांगितले तर नवं उद्योजक यांना प्रेरीत करने व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करणे हे कार्य डॉ कलाम फौंडेशन करीत असल्याचे अभिषेक आटोळे यांनी सांगितले .
या प्रसंगी कुणाल पलंगे, कार्तिक नाळे, रणजित बनकर, ज्ञानेश्वर कुंभार,सोनाली खाडे, प्रसन्नजित खोमणे, सुविराज कदम, अनिकेत कुरूमकर आदींचा युवा उद्योजक म्हणून सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णा खडके, यश मलगुंडे, अभिषेक आटोळे, शिवम देवडे, अभिजित ननावरे, निनाद गौड, पृथ्वीराज बांदल, संदेश आटोळे, आदी नि परिश्रम घेतले सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.



Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!