राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेतील विजेत्या संघासोबत मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,शिवाजीराव घोरपडे , बाबासाहेब गंगावणे अण्णासाहेब ननवरे शिवाजीराव काळे , महादेवराव माने , तुषार नाईक निंबाळकर , अमोल नाळे , सचिन धुमाळ , बी बी खुरंगे
फलटण टुडे ( फलटण ) : –
अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूलच्या 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकावले.
या यशस्वी खेळाडूंचा सत्कार महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा . श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे ,श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेवराव माने ,प्राचार्य श्री गंगवणे बी एम , उपप्राचार्य श्री ननवरे ए वाय , पर्यवेक्षक श्री काळे एस. एम., तुषार नाईक निंबाळकर व अमोल नाळे हे उपस्थित होते.
राज्यस्तरीय स्पर्धा अकोला येथे दिनांक 13 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा पहिला सामना कोल्हापूर विभाग विरुद्ध लातूर विभागाबरोबर झाला हा सामना 5- 0 गोलने कोल्हापूर विभागाने जिंकून सामन्याचे उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरी चा सामना अत्यंत चुरशीचा नागपूर विभागा विरुद्ध झाला. हा सामना 3 -1 ने जिंकून कोल्हापूर विभाग ( मुधोजी हायस्कूल ) संघाने सामन्याच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. या सामन्यात गोलकीपर म्हणून कु.अनुष्का चव्हाण हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या सामन्यात कु . शिफा मुलानी, निकिता वेताळ व तेजस्विनी कर्वे यांनी गोल नोंदवले. या स्पर्धेतील अंतिम सामना पुणे विभागा विरुद्ध झाला. हा सामना 6 -1 गोलने कोल्हापूर विभागाने एकतर्फी जिंकून सामन्याचे विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेमध्ये फॉरवर्ड लाईन मध्ये कु. सिद्धी केंजळे, कु.निकिता वेताळ,कु. प्रणिता राऊत, कु. श्रुतिका घाडगे, कु. श्रद्धा यादव व वेदिका वाघमारे यांनी गोल नोंदवले. बचाव फळी मध्ये कुमारी श्रुती चव्हाण, शिफा मुलानी, तेजस्विनी कर्वे, मानसी पवार , अनुष्का सपाटे, यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या संघाची कर्णधार कु . अनुष्का केंजळे हिने देखील उत्कृष्ट खेळ केला.या अगोदर1980 ते 1985 या काळा काळामध्ये ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक श्री जे.एन. धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुधोजी हायस्कूल ने मुलींचे शालेय/ग्रामीण/महिला हॉकी संघ राज्य व राष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच या अगोदर 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने 2009 मध्ये फलटण येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता.या यशस्वी खेळाडूंना ज्येष्ठ हॉकी क्रीडा मार्गदर्शक श्री महेश खुटाळे, श्री सचिन धुमाळ , श्री खुरंगे बी.बी., व कु.धनश्री क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले .
राज्यस्तरीय विजेत्या खेळाडूंना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना विधान परिषद विद्यमान सदस्य तथा महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे माजी सभापती मा.आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,चेअरमन फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, , महाराष्ट्र खो-खो असोसिएशन चे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे, क्रीडा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, अधीक्षक श्री श्रीकांत फडतरे, मुधोजी हायस्कूलचे स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच मुधोजी हायस्कूल चे प्राचार्य श्री गंगवणे बी.एम., उपप्राचार्य श्री ननवरे ए वाय , जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री फडतरे एम. के , पर्यवेक्षक श्री काळे शिवाजीराव व क्रीडा शिक्षक , शिक्षक वृंद तसेच हॉकीचे सर्व सीनियर हॉकी खेळाडू इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .