फलटण शहरातील शुक्रवार पेठ येथील कार्यकर्ता मेळाव्यात आ.श्रीमंत रामराजे बोलत होते.
*सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेवू*
‘‘फलटणची संस्कृती संपूर्ण जिल्ह्यात चांगली आहे. ती टिकवण्यासाठी नगरपालिका आपल्याकडेच रहायला हवी. जो पर्यंत मी डोळे मिटत नाही तोपर्यंत फलटण शहराला सोडणार नाही. ओबीसी आरक्षणाच्या निकालानंतर निवडणूका लागतील. आपले राजकारण सर्वसमावेशक असल्याने आपल्याला या निकालाचा फरक पडत नाही. सगळ्यांना विश्वासात घेवून जे ठरेल त्याच्या मागे तुम्ही ठामपणे उभे रहा’’, असे आवाहनही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना केले.
*आपापसात भांडणार्या नगरसेवकांकडही बघणार*
‘‘30 वर्षे आम्ही जे काम केले आहे त्यामुळे फलटण आधुनिक शहर होत आहे. विकासाची संस्कृती आम्ही तयार केली आहे. माझं माझ्या घरावर जेवढं लक्षं नसतं तेवढं फलटण तालुक्यावर व दुष्काळी भागावर लक्ष असतं. गेल्या 15 वर्षात शहराला निधी कमी पडू दिला नाही. काही कामे राहिली असतील, नागरिकांच्या काही तक्रारी असतील त्याही माझ्यापर्यंत येत असतात त्याही सोडवल्या जातील. काही नगरसेवक एकमेकांशी भांडत असतात त्यांच्याकडंपण मी या निवडणूकीत बघणार आहे’’, असेही सूचक विधान आ.श्रीमंत रामराजे यांनी यावेळी केले.
.तर त्यांच्या 10 पिढ्या फलटणमध्ये येणार नाहीत*
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उद्देशून बोलताना आ.श्रीमंत रामराजे म्हणाले, ‘‘त्यांना मिळालेल्या पदातून त्यांनी सोन्याचा फलटण तालुका करायला हवा होता. पण केवळ आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम त्यांच्याकडून सुरु आहे. निरा – देवघर माझ्या प्रयत्नातून झालं आणि पाईपलाईन मधून पाणी आणण्याचं श्रेय ते घेत आहेत. ते कौतुक करत असलेली रेल्वे रिकामी धावत आहे. त्या माणसाकडे चांगल काम करण्याची इच्छा नसून राक्षसी महत्त्वाकांक्षेचा तो मनुष्य आहे. आम्ही केलेल्या कामात अडचणी आणण्यापलिकडे त्यांनी काहीही केले नाही. अशा माणसांबाबत मी आता गप्प बसणारच नाही. पण माझ्यापेक्षा तुम्ही जर मनात आणलं तर त्या सद्गृहस्थाच्या पुढच्या 10 पिढ्या फलटणमध्ये येवू शकत नाहीत’’, असा टोलाही आ.श्रीमंत रामराजे यांनी लगावला.
प्रारंभी ढोल – ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे शुक्रवार पेठ येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मंडळाच्या गणपतीची आरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर मंडळाच्या ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांच्या हस्ते आ.श्रीमंत रामराजे यांचा सत्कार संपन्न झाला. यावळी प्राास्ताविक राहुल जग्नाथ निंबाळकर यांनी केले .
यावेळी शुक्रवार पेठेचे जेष्ठ कार्यकर्ते संजय मुरलीधर पालकर, सुनील मठपती , चंद्रकांत शिंदे ,सुदामराव मांढरे, विजय पालकर , नसरुद्दीन शेख, रणजीतभाऊ निबाळकर ,राजेंद्र आहेरराव यांनी श्रीमंत रामराजे यांचा पुष्पहार घालून सत्कार केला .
त्याचबरोबर कार्यक्रमाल प्रमुख
उपस्थिती म्हणून माजी नगरसेविकाश्रीमंत सुभद्राताई नाईक निंबाळकर ,माजी नगराध्यक्षा विद्याताई गायकवाड मा.नगरसेवक, मा. नगरसेविका प्रगतीताई कापसे, सुषमा सबनिस, फातिमा तांबोळी , मा . नितीन भैया भोसले ,बापूराव आहेरराव, मा . नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, भाऊसाहेब कापसे, अमरसिंह खानवीलकर ,दादासाहेब चोरमले, आनंदराव शितोळे, संजय हिंगे निजामभाई आतार,दत्तात्रय शिंदे.गणेश सुतार, ,सनी शिंदे, विशाल तेली पप्पू शेख ,सनी मांढरे, प पै .राहुल सरक सुजय कापसे ,बाळासाहेब पवार , बाळासाहेब जानकर, महेश पवार ,प्रदिप पवार महेश दळवे, माऊली पवार , संग्राम निंबाळकर, राहुल घारपडे ,यशपाल भोसले ,रणजीत बर्गे ,दिपक देशमुख, महेश सुतार , फिरोज शेख , संदिप कर्वे ,समिर सुर्वे, सौरभ बेन्द्र, राजेंद्र बन्द्रे योगेश हिंगे , जितेंद्र तेली, हेदर शेख, केदार कर्वे, शेरखान मेटकरी, बिटु पिसाळ संदिप चोरमले अरुन पवार, अवि पवार ,शाम कापसे ‘उदयसिंह काटकर
शुक्रवार भागातील सर्व मंडळाचे पदधीकारी व आजी – माजी नगरसेवक, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट : –
अजिंकय (बंटी) गायकवाड, राहुल निंबाळकर , निलेश खानवीलकर
राकेश तेली, जितेंद्र मठपती, सनी पवार, अभिजीत निंबाळकर , पप्पुबाई शेख, बापु देशमुख यांनी या प्रसगी श्रीमंत रामेश्वर महागणपतीची प्रतिमा श्रीमंत रामराजे यांना भेट म्हणून दिली