फलटण टुडे (आनंद पवार.आसू.)
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं त्यामुळे आपण खंबीरपणे उभे आहोत आजच्या पिढीने जर शिवचरित्र वाचले तर आजची तरुण पिढी आधुनिक भारतासाठी सक्षम बनेल असे मत शिवव्याख्याते सागर काटकर यांनी केले.
सासकल तालुका फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवव्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या वेळी ते बोलत होते यावेळी श्री मोहनराव डांगे, पोलीस पाटील संघटनेचे हनुमंतराव सोनवलकर पाटील, प्राध्यापक रवी कुमार ठावरे ओमकार पवार यांच्यासह सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती सासकल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या तरुणाईने छत्रपती शिवरायांचे आदर्शवादी विचार घेणे गरजेचे आहे आपण छत्रपती शिवरायांच्या विचार आत्मसात केले तर आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल छत्रपती शिवरायांनी घडवलेले स्वराज्य हे आजच्या पिढीसाठी आदर्शवादी व प्रेरणादायी असून छत्रपती शिवरायांचा आदर्श तरुण पिढीने घेणे गरजेचे आहे असे मत शिवव्याख्याते सागर काटकर यांनी बोलताना व्यक्त केले.
आजच्या काळात मोबाईल मध्ये आपण आपला वेळ खर्च करत आहोत परंतु त्याचबरोबर प्रत्येकाने वाचन करावे छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वाचन आपण केले तर आपले विचार सुधारतील त्यामुळे आपण आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करण्यास अधिक सक्षम होऊ छत्रपती शिवरायांचे सर्व क्षेत्रातील कार्य हे उल्लेखनीय होते त्यांच्या कार्याचा विचार आजच्या पिढीने करणे गरजेचे आहे असे मत सागर काटकर यांनी व्यक्त केले.
शिवचरित्र ऐकणे शिवचरित्राचा अभ्यास करणे यासाठी प्रत्येक तरुणाईने शिवचरित्राचे वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे शिवचरित्रातून आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळून आपण आपले आयुष्य उत्तम रित्या जगू शकतो हेच आपण शिवचरित्रातून शिकू शकतो त्यामुळे शिवचरित्र हे आजच्या पिढीसाठी आदर्शवत असल्याचे प्रतिपादन सागर काटकर यांनी व्यक्त केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती सासकल च्या वतीने उपस्थित मान्यवर यांचे स्वागत करण्यात आले यावेळी परिसरातील ग्रामस्थ व तरुण मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.