ग्रामसुरक्षा दल व पोलीस पाटील यांचे मदतीने पर जिल्ह्यातील खुनातील फरार आरोपी गजाआड

 |

 

पोलीसांनी पकडलेला आरोपी

पोलीसां सोबत ग्रामसुरक्षा दल, पोलीस पाटील

  फलटण टुडे ( फलटण ) :
       धुळे तालुका पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गु. र.न ८७/२०२३ भा. द. वि ३०२ मधील आरोपी नामे रोहिदास दादासो जाधव राहणार निंबळक तालुका फलटण जिल्हा सातारा याने दिनांक १२/२/२०२३ रोजी रमणपुरा शिवार ता.जि धुळे येथे आदर्श प्रल्हाद पिसाळ राहणार शिंदेवाडी तालुका धुळे जिल्हा धुळे याचा खून करून यातील आरोपी नामे रोहिदास दादासो जाधव हा फरार झाला होता. सदर आरोपीबाबत स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे संपर्क साधून सदर घटनेबाबत कळविले असता फलटण ग्रामीण पोलीस ठाणे सदर आरोपीच्या मार्गावर होते.
    
दिनांक २० फेब्रवारी २०२३ रोजी सायं ०६.०० वा . चे सुमारास सदर आरोपी हा निंबळक तालुका फलटण जिल्हा सातारा येथे येणार असले बाबतची आम्हास खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः स्टाफसह सदर ठिकाणी जात असताना सदरचा आरोपी हा पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या बाबतची माहिती बातमीदाराकडून समजले असता आम्ही तात्काळ गावातील ग्राम सुरक्षा दल व पोलीस पाटील प्रमोद ज्ञानदेव बनकर यांना सदर आरोपी ताब्यात घेण्याकरिता सांगितले असता त्यांनी आरोपींना मे रोहिदास दादासो जाधव राहणार निंबळक तालुका फलटण जिल्हा सातारा यास ताब्यात घेतले असता आम्ही तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सदर आरोपीस ताब्यात घेतले व स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्याशी संपर्क करून ताब्यात दिले.
     
सदरची कारवाई मा.श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा.श्री.बापू बांगर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली मा श्री तानाजी बरडे सो उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग,श्री धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे सहा.पो.नि.नितीन शिंदे,पो.उपनि सागर अरगडे,पोहवा अमोल कर्णे ब.न ६३७, पोहवा अडसूळ ब.न ७३१,पो ना अभिजीत काशीद ब.न.६६१, पोना अमोल जगदाळे ब.न १२९, पोना योगेश रणपिसे ब.न.८०६ यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!