**
फलटण टुडे (बारामती ):
स्नेहसंमेलनमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ निर्माण होते त्यांच्यामधील कलागुणांना वाव भेटतो त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद चे मा. अध्यक्ष सतीश खोमणे यांनी केले.
कै. लक्ष्मीबाई पवार एज्युकेशन फाऊंडेशनचे फिनिक्स इंग्लिश मेडियम स्कूल कनेक्ट पोदार जंबो किडस् सुर्यनगरी ,बारामती चे वार्षिक स्नेहसंमेलन उदघाटन प्रसंगी सतीश खोमणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम पवार,जायंटस् ग्रुपचे अध्यक्ष ,इक्बाल भाई अब्बास भाई डिन , बारामती बँकेचे संचालक आदेश वडूजकर ,उद्योजक शेखर कोठारी , मोता ग्रुपच्या संचालिका सौ.निधी मोता, डॉ. सौ. ऊज्वला कोठारी,ओंकार पवार ,डॉ. स्नेहल पवार आदी मान्यवर उपस्तीत होते.
अत्याधुनिक युगात मोबाईल टीव्ही पेक्षा मैदानी खेळ व स्नेहसंमेलन ही काळाची गरज असल्याचे सतीश खोमणे यांनी सांगितले.
गुणवता व दर्जात्मक शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम पवार यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले.
२६ जानेवारी निमित्ताने शाळेत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
या वर्षीचे स्नेहसंमेलन
वगबंधु या संकल्पनेवर आधारित होते.महाराष्ट्र राजस्थान ,गुजरात ,जम्मू काश्मीर , आसाम ,गोवा, तामिळनाडू , प. बंगाल इ. राज्यातील वेषभूषा परिधान करून मुलांनी पारंपरिक नृत्य सादर केले.
सूत्रसंचालन मुख्याधिपिका सौ. ओमी पिरजादे यांनी केले.