जिजाऊ भवन येथे चित्रकला स्पर्धा बक्षीस समारंभ शिवजयंती दिवशी होणार…

जिजाऊ भवन येथे चित्रकला स्पर्धे साठी सहभागी विद्यार्थी

फलटण टुडे (बारामती ): 
बारामती तालुका मराठा सेवा संघ, जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने खास शिवजयंती निमित्त शिवाजी महाराज, भारत देश, पर्यावरण वाचवा,जय जवान जय किसान व जय विज्ञान आदी विषयावर चित्रकला स्पर्धा संपन्न झाल्या.
 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत बारामती शहरातील विविध शाळे मधील ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यासाठी फक्त मराठी शाळेतील मुलांना प्राधान्य दिले होते. हि स्पर्धा चार गटातून घेण्यात आली. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ दोन असे क्रमांक निवडले गेले. आणि सहभाग घेणार्या प्रत्येकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
  19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशी जिजाऊ भवन येथे मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना व सहभागी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारामती तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव तुपे व इतर पदाधिकारी आणि 
जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा हेमलता परकाळे,उपाध्यक्ष स्वाती ढवाण, सचिव ज्योती खलाटे,सहसचिव सारिका परकाळे, खजिनदार संगीता शिरोळे,सहखजिनदार अर्चना परकाळे, सहकार्यध्यक्ष प्रतिभा बर्गे, कार्याध्यक्ष सुनंदा जगताप व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!