बसस्टॉण्डमध्ये गर्दीचा फायदा घेवुन महीलांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरी करणा-या आंतरजिल्हयातील सक्रीय टोळीला लोणंद पोलीसांनी केले जेरबंद

आंतरजिल्हयातील सक्रीय टोळीतील अटक केलेल्या महिला व लोणंद पोलीस स्टेशनचे 

स पो नि श्री विशाल वायकर व इतर पोलीस कर्मचारी
फलटण टुडे (लोणंद ) :-
लोणंद पोलीस ठाणे हददीत बसस्टॅण्ड लोणंद येथे महीला बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेवुन वृध्द महीलांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरी केलेबाबत लोंणद पोलीस ठाणेत गुन्हे दाखल झाले होते.सदर गुन्हयाचे तपासाबाबत वरीष्ठ अधिकारी यांनी सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे लोणंद पोलीस ठाण्याचेप्रभारी सपोनि श्री. विशाल वायकर, व त्यांचे सहका-यांनी सदर घडणा-या गुन्हयाबाबत सीसीटीव्ही फुटेज,
तांत्रीक विष्लेषनाचे आधारे यातील आरोपीनी गुन्हा करतेवेळी वापरलेली इनोव्हा कार व आरोपी निष्पन्न केले.

सदर आरोपी या महीला असुन त्या उदगीर, लातुर येथुन इनोव्हा कारमधुन येवुन त्यांनी लोणंद तसचे वाई, औरंगाबाद (ग्रा) ,कवठे महाकाळ (सांगली), सांगली शहर, नाशिक, ओतुर (पुणे), लोणींकंद (पुणे) या पोलीस
ठाणे हददीतील एकुण १६ चोरीचे गुन्हे केलेचे निष्पन्न झालेले आहे. सदर महीला आरोपींची पोलीस कोठडी घेवुन आरोपींकडुन चोरी केलेले एकुण १० तोळे सोन्याचे दागिने, व इनोव्हा कार असा एकुण १५,४०,०००/- रु. किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपींनी लोणंद पोलीस ठाणे हददीत तसेच इतर जिल्हयातील केलेल्या गुन्हयाची कबुली दिली आहे.

जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील सदर गुन्हयाचा तपास मा.पोलीस अधीक्षक सो सातारा श्री. समीर शेख, मा.अप्पर पोलीस अधीक्षक साो. श्री. बापु बांगर, मा.उपविभागीय पोलीस अधीकारी फलटण सो. श्री.तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे स पो नि श्री विशाल वायकर, पो उ नि. गणेश माने, मपोउपनि स्वाती पवार,पो.हवा. संतोष नाळे, अतुल कुंभार, पो.ना. श्रीनाथ कदम, सर्जेराव सुळ, अमोल पवार,फैय्याज शेख, अभिजित घनवट, अविनाश शिंदे, केतन लाळगे, प्रमोद क्षिरसागर, चालक विजय शिंदे, विठठल काळे, प्रिया दुरगुडे, अश्विनी माने, तसेच उदगीर पो.स्टे. लातुर कडील पोलीस अंमलदार पुलेवाड यांनी कारवाई केली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सो, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधिक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!