बारामती आगार व्यवस्थापक मोरे यांना निवेदन देताना श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वामीनाथ साबळे , आसू ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच धनंजय घोरपडे व आसू ग्रामस्थ
फलटण टुडे (आसू दि.१६ ) :
फलटण तालुक्यातील पूर्व भागातील आसू परिसरातील असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवाशांची सोय व्हावी, व बारामती आसू बस सेवा सुरू व्हावी यासाठी आज बारामती आगाराला दिले आसू ग्रामस्थांच्या वतीने दिले निवेदन.
नीरा नदी पट्ट्यातील कडेला असणारी गावे आसू, पवारवाडी, शिंदेनगर ,ढवळेवाडी, गोखळी, गवळीनगर, खटकेवस्ती माळी मळा, जाधववाडी, शिंदेवाडी आदी परिसरातील ग्रामस्थांची व विशेष करून शालेय विद्यार्थ्यांची एसटी विना खूप मोठी परवड होत आहे. फलटण इंदापूर तालुक्याला जोडणारा आसू बंधारा ा नदीवरील बंधाऱ्यावरून चालत जाताना विद्यार्थ्यांची जीवावर उदार होऊन त्या बंधार्यावर चालत जावे लागते.
ग्रामस्थांच्या वतीने अनेक वेळा बारामती आगाराला निवेदन दिले होते परंतु त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
आज आसू ग्रामस्थांच्या वतीने पुणे परिवहन विभागाचे आयुक्त रमाकांत गायकवाड व बारामती डेपो चे आगार व्यवस्थापक मोरे यांना निवेदन दिले.
फलटण पेक्षा बारामती जवळ असल्याने अनेक मुलींचे व मुलांची शिक्षणाची सोय बारामतीला होत असते त्यामुळे अनेकांनी त्या भागांमध्ये ऍडमिशन घेतले आहेत परंतु तेथील अधिकाऱ्यांना त्याच्याबाबत देणंघेणं नसल्याने मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यातच अनेक मुलांची परिस्थिती आर्थिक असल्याने चक्क तीन किलोमीटर चालत जावे लागते. त्यातच नीरा नदीवर असणाऱ्या बंधार्यावर जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे त्यामुळे आसूतील सुज्ञ ग्रामस्थांनी याबाबतचे निवेदन आगारप्रमुखांना दिले आहे.
एसटी प्रशासनाने याबाबतच्या निवेदनाची गंभीर दखल घ्यावी कारण कॉलेजइन युवतींना खूप मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे जर एसटी बंद राहिली तर हजारो मुलींचे शिक्षण यामुळे बंद होणार असल्याची भीती पालकांतून व्यक्त होत आहे त्यामुळे वेळीच एसटी प्रशासनाने याबाबतची दखल घेऊन बारामती आसू एसटी चालू करावीअसे निवेदन बारामती आगाराला देण्यात आले आहे.
हे निवेदन श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वामीनाथ साबळे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच धनंजय घोरपडे व ग्रामस्थ यांनी याबाबतचे निवेदन दिले.