फलटण टुडे ( फलटण ) : –
मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे रविवार, दि.12 फेब्रुवारी, 2023 रोजी मुधोजी महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने “माजी विद्यार्थी स्नेह-मेळावा”
आयोजित केला होता तो उत्साहात संपन्न झाला.
या स्नेह-मेळाव्यात 2009-2010 च्या बॅचचे एकूण 25 विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच विभागातील निवृत्त प्रा. डॉ. सुधीर इंगळे, प्रा.आर.एस.पाठक व विभागातील निवृत्त सेवक श्री. रघुनाथ घोलप हे उपस्थित होते.
प्रारंभी सर्व माजी विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘उदय’ वार्षिक नियतकालिकाचा अंक देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचे वृक्ष देऊन पर्यावरण पूरक स्वागत केले. प्रा. व्ही. एच. मदने यांनी प्रास्ताविक करून स्नेह- मेळाव्याच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला.
सर्वच उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त केला. तर भूगोल विभागाच्या माध्यमातून आम्हाला अनेक गोष्टी शिकता आल्या असे व्यक्त करताना भूगोल विषयाचा विद्यार्थी, जीवनात अपयशी होत नाही असे मत मांडले. तर काहींनी मनोगत व्यक्त करताना कॉलेज जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला .