सर्व विद्यार्थ्यांना मा.सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फलटण टुडे : –
श्रीनिवास पाटील फाउंडेशन सातारा आयोजित “युवोत्सव सातारा” या स्पर्धेच्या अंतिम फेरीत फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटणचे विद्यार्थी कु. सानिया शेख, कु नंदिनी पवार व अजय केसकर दाखल झाले होते. दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सातारा येथे अंतिम फेरी संपन्न झाली. दिनांक ८ फेब्रुवारी रोजी स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. कु.नंदीनी महेंद्र पवार -निबंध स्पर्धा विजेतेपद, सानिया शफिक शेख -वक्तृत्व स्पर्धा उपविजेतेपद, अजय पोपट केसकर -एकलगायन स्पर्धा उपविजेतेपद या स्पर्धाप्रकारांमधुन यश संपादन केले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी.नार्वे यांनी दिली. या विद्यार्थ्यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासनाधिकारी अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी.नार्वे, उपप्राचार्य मिलिंद नातू, सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. चंद्रकांत गोरड
यांनी अभिनंदन केले.